"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:03 IST2026-03-02T12:02:17+5:302026-03-02T12:03:48+5:30
एका स्पोर्ट्स लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान रणबीर कपूर पापाराझींवर चांगलाच संतापला. काय घडलं नेमकं?

"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात त्याचा पारा चढलेला पाहायला मिळाला. एका स्पोर्ट्स लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान रणबीर कपूर पापाराझींवर (फोटोग्राफर्स) चांगलाच संतापला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
काय घडलं नेमकं?
रविवारी रणबीर कपूर एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये गेला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिषेक बच्चनही सहभागी होता. इव्हेंटला जाताना रणबीर काहीसा घाईत होता. रणबीरला शूट करण्यासाठी अनेक कॅमेरामन पुढे आले. अचानक एक कॅमेरा रणबीरच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ गेला. त्यामुळे रणबीर काहीसा संतापून म्हणाला- ''कॅमेरा तोंडाच्या आत टाकतोय हा...'', असं म्हणत रणबीर काहीसा रागात पुढे गेला. पण पुढे मात्र त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसूही होतं. एकूणच रणबीरचा टोन रागाचा असला तरीही नंतर त्याने वातावरण सावरलं.
रणबीर कपूर आणि पापाराझी यांचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनेकदा तो फोटोग्राफर्ससोबत मस्करी करताना दिसतो, तर काही वेळा त्यांच्या वागणुकीवर नाराजीही व्यक्त करतो. सध्या रणबीर त्याच्या आगामी 'रामायण' आणि 'अॅनिमल पार्क' या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे, पण या व्हायरल व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. रणबीरच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.