भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:53 IST2026-04-10T11:52:26+5:302026-04-10T11:53:02+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट ॲक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्गज कॉमेडियन राजपाल यादवची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे

actor Rajpal Yadav's entry in Salman khan upcoming film nayanthara also will be seen | भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार

भाईजानने शब्द पाळला! सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादवची एन्ट्री, 'ही' अभिनेत्रीही झळकणार

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट ॲक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, दिग्गज कॉमेडियन राजपाल यादवची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या या बहुप्रतिक्षित ॲक्शन एंटरटेनरमध्ये राजपाल यादव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य सुंदरी नयनतारा मुख्य भूमिकेत असून सलमान आणि राजपाल यादवची जोडी बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या चित्रपटात राजपाल यादव हा सलमान खानच्या 'राईट हँड'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. कथेत या दोघांमधील केमिस्ट्री अत्यंत मजेशीर आणि प्रभावी असेल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सलमान खानला वैयक्तिकरित्या राजपाल यादवचे काम खूप आवडते आणि या विशिष्ट भूमिकेसाठी राजपालच योग्य असल्याचे त्याचे मत होते. यापूर्वी या दोघांनी 'मुझसे शादी करोगी' आणि 'पार्टनर' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप भावली होती.

राजपाल यादव सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणींमुळे चर्चेत होता, मात्र सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला उघडपणे पाठिंबा दिला होता. "राजपाल भाई, तुम्ही ३० वर्षांपासून काम करत आहात आणि तुमच्याकडे स्वतःचं एक टॅलेंट आहे, तुम्हाला नक्कीच खूप काम मिळेल," अशा शब्दांत सलमानने त्याचे कौतुक केले होते. आता सलमानने स्वतःच आपल्या चित्रपटात राजपालला संधी देऊन त्याला मोठी साथ दिली आहे. ॲक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात सलमान, नयनतारा आणि राजपाल यादव यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आता कमालीचे उत्सुक आहेत.

Web Title : भाईजान का वादा पूरा: सलमान की फिल्म में राजपाल यादव की एंट्री!

Web Summary : राजपाल यादव सलमान खान की अगली एक्शन फिल्म में शामिल हुए, जिसमें नयनतारा भी हैं। यादव सलमान के 'राइट हैंड' की भूमिका निभाएंगे, जिससे बेहतरीन केमिस्ट्री और कॉमेडी की उम्मीद है। सलमान ने यादव का समर्थन किया, अभिनेता की प्रतिभा की प्रशंसा के बाद अपना वादा निभाया।

Web Title : Salman Khan Keeps Promise: Rajpal Yadav Enters Upcoming Film!

Web Summary : Rajpal Yadav joins Salman Khan's next action film, also starring Nayanthara. Yadav plays Salman's 'right hand,' promising great chemistry and comedy. Salman supports Yadav, fulfilling his promise after praising the actor's talent.