कीस करण्यासाठी अॅक्टर जवळ गेला, पण पत्नीनं नकार दिला, कारण..; अभिनेत्यानं सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:24 IST2025-01-29T14:23:33+5:302025-01-29T14:24:17+5:30
रघु राम म्हणाला, त्याची पत्नी नताली धूम्रपान करत नाही म्हणून त्याने धूम्रपान सोडले. खरेतर, जेव्हा रघु रामने तिला किस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मागे हटली होती. रघुराम 'कपल ऑफ थिंग्स' या शोमध्ये बोलत होता...

कीस करण्यासाठी अॅक्टर जवळ गेला, पण पत्नीनं नकार दिला, कारण..; अभिनेत्यानं सांगितला अनुभव
अॅक्टर रघु राम आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफसंदर्भात नेहमीच चर्चेत असतो. त्याने 2018 मध्ये नताली डि लुसियोसोबत लग्न केले होते. तो आता त्याच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत आनंदी आहे. रघु राम म्हणाला, त्याची पत्नी नताली धूम्रपान करत नाही म्हणून त्याने धूम्रपान सोडले. खरेतर, जेव्हा रघु रामने तिला किस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मागे हटली होती. रघुराम 'कपल ऑफ थिंग्स' या शोमध्ये बोलत होता.
यासंदर्भात बोलताना रघु राम म्हणाला, 'मी प्रचंड स्मोक करत होतो. मला दिवसाला एक-दोन पॅकेट लागत होते. मात्र आम्ही डेट करायला सुरुवात केल्यानंत माझ्या लक्षात आले की नतालीने कधीही स्मोकिंग केलेले नाही. ना तिने कधी कुण्या स्मोकरला डेट केले आहे.
रघु राम पुढे म्हणाला, "मला आठवते, जेव्हा आम्ही पहिल्यांदाच डेटवर गेलो होतो, नतालीला तीच्या ठिकानावरून पिक करण्यापूर्वी मी माझ्या घरी स्मोकिंग केले होते. जेव्हा आम्ही बेटलो, तेव्हा मी तिला कीस करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिगारेटच्या दुर्गंधीमुळे मी तिची रिअॅक्शन बघितली. ती म्हणाली होती की, 'तू स्मोक करतोस हे मी विसरले होते.' तेव्हा मला जाणीव झाली की, या नात्यात आपल्याला पुडे जायचे असेल, तर स्मोकिंग सोडावी लागेल."
लग्नासंदर्भात बोलताना तो म्हणाला, "आम्ही बीचवर तेलुगू पद्धतीने लग्न केले आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यानंतर, पंजाबी परंपरा पार पडल्या. आम्ही प्रचंड एंजॉय केला. आम्ही कोर्ट मॅरेजही केले. कारण आमचे धर्म वेगवेगळे आहेत. सर्वकाही अत्यंत पॉझिटिव्ह होते." एमटीव्ही रोडीजसाठी रघु राम ओळखला जातो. तो जजच्या भूमिकेत दिसतो.