अभिनयासाठी सोडली वैमानिकाची नोकरी, पहिल्याच चित्रपटातून मिळाला स्टारडम, पण...; असा होता मुकुल देवचा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:21 IST2025-05-24T16:16:53+5:302025-05-24T16:21:05+5:30

Mukul Dev Passed Away : वैमानिकाची नोकरी सोडून धरली अभिनयाची वाट ; पहिल्याच चित्रपटाने यश मिळवलं, पण... असा होता मुकुल देवचा प्रवास!

actor mukul dev left pilot job for acting debut with sushmita sen in dastak movie know about her journey | अभिनयासाठी सोडली वैमानिकाची नोकरी, पहिल्याच चित्रपटातून मिळाला स्टारडम, पण...; असा होता मुकुल देवचा प्रवास!

अभिनयासाठी सोडली वैमानिकाची नोकरी, पहिल्याच चित्रपटातून मिळाला स्टारडम, पण...; असा होता मुकुल देवचा प्रवास!

Mukul Dev Journey: बॉलिवूड अभिनेता मुकुल देवच्या (Mukul Dev) निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या नायकाच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी मुकुल देव वैमानिकाची नोकरी करत होता. असं सांगण्यात येतं. याबद्दल जाणून घेऊया... 

अभिनेता मुकुल देव हा टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा होता. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्याने बरेच टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं. १९९६६ मध्ये आलेल्या दस्तक या सिनेमातून इंडस्ट्रीत डेब्यू केला. या चित्रपटात सुष्मिता सेनसोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती. तसेच या चित्रपटातील 'जादू भरी आँखों वाली सुनो' हे गाणे त्या काळात प्रचंड गाजलं होतं. अभिनेता होण्यापूर्वी मुकुल देवने कमर्शिअल पायलट म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. पण त्याला सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता. म्हणूनच या नोकरीकडे पाठ फिरवून त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. 

'दस्तक' चित्रपटात मुकुल देवने एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर सुष्मितासोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांची प्रचंड भावली होती. त्यानंतर अभिनेत्याने 'किला', 'वजूद' आणि 'मुझे मेरी बीवी से बचाओ' या चित्रपटांमध्ये देखील काम केलं पण बॉक्स  हे चित्रपट ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत.
शिवाय अभिनेत्याने हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच 'यमला पगला दीवाना', 'सन ऑफ सरदार' आणि 'आर राजकुमार' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं.

Web Title: actor mukul dev left pilot job for acting debut with sushmita sen in dastak movie know about her journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.