अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:29 IST2025-08-23T11:28:38+5:302025-08-23T11:29:14+5:30
Govinda And Sunita Ahuja: गोविंदा आणि सुनीता आहूजा यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता सुनीताने वांद्रे येथील कौटुंबिक कोर्टात अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. तसेच तिने गोविंदावर अनेक आरोप केले आहेत.

अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहूजा (Sunita Ahuja) यांची केमिस्ट्री इतर बॉलिवूड जोडप्यांपेक्षा खूप वेगळी आहे. कपिल शर्माच्या शोमध्येही ते एकमेकांवर टीका करताना दिसले, पण त्यांच्यातील प्रेम कधीच कमी झाले नाही. मात्र, सोशल मीडियावर हे स्टार जोडपे वेगळे होत असल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळत आहेत. याला हे जोडपे स्वतःच कारणीभूत आहे, कारण त्यांच्या विधानांवरून लोक त्यांच्या वेगळे होण्याचा अर्थ काढत आले आहेत. सुनीताने तिच्या पतीबद्दल असे अनेकदा विधान केले आहेत, ज्यामुळे लोकांना त्यांच्यात त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे वाटते. आता पुन्हा एकदा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. दरम्यान आता चर्चेवर चीची (गोविंदा)च्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावेळी असा दावा केला जात आहे की, सुनीताने गोविंदावर फसवणूकीचा आरोप केला आहे आणि आता या जोडप्याचे ३८ वर्षांचे नाते तुटणार आहे. हॉटरफ्लायच्या वृत्तानुसार, सुनीता आहुजाने ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अहवालात म्हटले आहे की सुनीताने प्रेम आणि विवाहात फसवणूक, दुखावणे आणि वेगळे राहण्याच्या आधारावर हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia), (ib) अंतर्गत खटला दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने गोविंदालाही समन्स बजावले होते आणि पुढील कार्यवाहीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अभिनेता मे २०२५ पर्यंत न्यायालयात हजर राहिला नाही.
सुनीताने दिला शाप
सुनीताने अलीकडेच तिचा युट्यूब प्रवास सुरू केला आहे. तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये, ती भावनिक झाली आणि तिच्या वैवाहिक जीवनात तिला येणाऱ्या समस्यांबद्दल बोलली. ती म्हणाली, "प्रत्येक आनंद मिळवणे इतके सोपे नसते. कधीकधी जीवन खूप वाईट होते. मी माझ्या वैवाहिक जीवनाला आशीर्वाद देण्यासाठी आईला वारंवार प्रार्थना करत राहिले जेणेकरून मी आनंदी जीवन जगू शकेन." ती पुढे म्हणाली, "माझे घर कोणीही तोडण्याचा प्रयत्न करेल... जो कोणी माझे मन दुखवेल, ही माता काली त्यांचे गळे कापून टाकेल. एका चांगल्या व्यक्तीला, चांगल्या स्त्रीला दुखावणे ही चांगली गोष्ट नाही. परिस्थिती काहीही असो, मी तिन्ही मातांवर खूप प्रेम करते आणि जो कोणी माझे घर आणि कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करेल, माता त्याला सोडणार नाही,"
गोविंदाचे वकील म्हणाले...
दरम्यान, गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी त्यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात जुन्या बातम्या चालवल्या जात आहेत, असे काहीही नाही. त्यांनी सांगितले की, गोविंदा आणि सुनीता यांच्यात सर्वकाही ठीक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर गोविंदा आणि सुनीता संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र दिसणार आहेत.
गोविंदा-सुनीताचं वैवाहिक जीवन
गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ मध्ये लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत, जी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अजून मोठा ब्रेक मिळालेला नाही. गोविंदासुद्धा पुन्हा कामाला सुरुवात करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, पण त्याला वारंवार निराशाच मिळत आहे. दुसरीकडे, सुनीताने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे, ज्यावर तिच्या फोटोसोबत 'बीवी नंबर १' असे लिहिले आहे. गोविंदाच्या पत्नीने आठवडाभरापूर्वीच हे युट्यूब अकाउंट तयार केले आहे, ज्यावर आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर झाले आहेत.