फरहान अख्तरची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:29 IST2026-02-13T15:13:28+5:302026-02-13T15:29:02+5:30
क्या बात! फरहान अख्तरच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, बॉलिवूड गाजवल्यानंतर हॉलिवूडमध्ये एन्ट्री

फरहान अख्तरची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! हाती लागला मोठा प्रोजेक्ट, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Farhaan Akhtar: अभिनेता फरहान अख्तर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. फरहान अख्तर हा फक्त अभिनयासाठीच नाही, तर त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांसाठीदेखील ओळखला जातो. १९९१ मध्ये अभिनेत्याने १७ व्या वर्षी त्याच्या करिअरला सुरुवात केली.सध्या अभिनेता डॉन ३ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा फरहानच्या खांद्यावर आहे. अलिकडेच फरहान '120 बहादुर' चित्रपटात पाहायला मिळाला. त्यानंतर आता फरहान पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूड इंडस्ट्री गाजवल्यानंतर रणदीपची हॉलिवूड चित्रपटात वर्णी लागली आहे.
फरहान अख्तर सध्या 'डॉन ३'मुळे चर्चेत आहे. रणवीर सिंगने तीन वर्षांपासून रखडलेल्या या चित्रपटातून एक्झिट घेतल्याने सर्वांचं लक्ष या प्रोजेक्टडे लागलं आहे. यामुळे फरहानच्या निर्मिती संस्थेकडून रणवीर त्याच्याकडून ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या वादांमध्ये, फरहानच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, सोनी पिक्चर्सने फरहान अख्तरसोबत हातमिळवणी केली असून 'द बीटल्स - अ फोर फिल्म सिनेमॅटिक इव्हेंट' या हॉलिवूड चित्रपटात तो काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडिस दिग्दर्शित करणार आहेत. फरहान अख्तरची भूमिका असलेला हा चित्रपट एप्रिल २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात फरहानसह लुसी बॉयंटन, मॉर्फिड क्लार्क आणि हॅरी लॉटी यांच्याही भूमिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फरहान अख्तर या हॉलिवूड चित्रपटात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सतारवादक पं. रविशंकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.