Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाश्मीला शूटिंगदरम्यान मोठी दुखापत; करावी लागली शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:25 IST2025-12-21T11:20:44+5:302025-12-21T11:25:22+5:30
Emraan Hashmi Injured During Shooting : चित्रपटाच्या सेटवर अभिनेता इमरान हाश्मी गंभीर जखमी, अॅक्शन सीन करताना घडलं असं काही...; चाहते चिंतेत

Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाश्मीला शूटिंगदरम्यान मोठी दुखापत; करावी लागली शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Injured During Shooting:बॉलिवूडचा सिरियल किसर ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे इमराम हाश्मी(Emraan Hashmi). 'आशिक बनाया आपने', 'मर्डर', 'एक थी डायन' तसेच 'टायगर-४', 'ग्राउंड झिरो' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.इमरान हाश्मी हा त्याच्या हटके भूमिकांमधून आणि उत्तम चित्रपटांच्या माध्यमातून सिने-रसिकांच्या भेटीला आला आहे. सध्या बॉलिवूडचा हा लव्हर बॉय त्याचा आगामी आवारापन-२ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. येत्या २०२६ मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यात आता या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एका स्टंटचे चित्रीकरण करत असताना एक दुर्घटना झाली आहे.
आवारापन-२ च्या सेटवर अभिनेता इमरान हाश्मी गंभीर जखमी झाला आहे.पोटातील टिश्यू फुटल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया होऊनही इमरान हाश्मीने चित्रपटाचं चित्रीकरण न थांबवता आता तो पुन्हा सेटवर परतला आहे. एक ॲक्शन सीन करताना अभिनेत्याला दुखापत झाली. इमरानवरसध्या राजस्थानमधील शूटिंगच्या ठिकाणी अभिनेता डॉक्टरांच्या देखरेखीखाली शूट करत असल्याचं समजतंय. तसेच चित्रपटातील त्याचे ॲक्शन सीक्वेन्स मर्यादित ठेवण्यात आले आहेत आणि त्यांचे आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. चित्रीकरण कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील यासाठी वेळापत्रकात बदलही करण्यात आले आहेत.
'अवारपन' हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता.या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि श्रिया सरन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि 'सय्यारा' चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी याचे दिग्दर्शन केले होते.१९ वर्षांनंतर 'आवारापन'चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी 'आवारापन-२' जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.