Video: "भाई येत आहेत..."; सलमानला पाहताच अली फझल-रिचा चढ्ढा दूर निघून गेले, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:39 IST2026-02-02T13:37:02+5:302026-02-02T13:39:18+5:30
अली फझल आणि रिचा चढ्ढाही उपस्थित होते. दोघेही पापाराझींसोबत फोटोशूट करण्यात मग्न होते. अचानक त्यांना लांबूनच सलमान येताना दिसला. पुढे काय घडलं?

Video: "भाई येत आहेत..."; सलमानला पाहताच अली फझल-रिचा चढ्ढा दूर निघून गेले, काय घडलं?
सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमानचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सलमानची सर्वांना आदरयुक्त भीती वाटते. याचा अनुभव नुकताच आला. सलमान एका सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी तिथे अली फझल आणि रिचा चढ्ढाही उपस्थित होते. दोघेही पापाराझींसोबत फोटोशूट करण्यात मग्न होते. अचानक त्यांना लांबूनच सलमान येताना दिसला. पुढे काय घडलं?
रिचा आणि अलीसोबत काय घडलं?
Variety नावाच्या एका प्रोजक्टमध्ये रिचा आणि अली हे सेलिब्रिटी जोडपं सहभागी होतं. यावेळी दोघेही एकमेकांचा हात हातात धरुन रेड कार्पेटवर आले. ते दोघेही पापाराझींसमोर फोटोशूट करत होते. अशातच अली आणि रिचाला दुरुनच सलमान खान येताना दिसला. त्यामुळे त्यांनी तिथून दूर निघून जाणं पसंत केलं. अलीने ''भाई येतोय, भाई येतोय...,'' अशी सुचना पापाराझींना केली. पुढे सलमानची त्याच्या स्वॅगमध्ये एन्ट्री झाली. अलीने दुरुनच सलमानला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला.
अशाप्रकारे हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सलमान खानचा किती दरारा आहे हेच यावरुन पाहायला मिळालं. अली आणि रिचाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, दोघंही काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. रिचा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तर अली सध्या 'मिर्झापूर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ओटीटीवर गाजलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजचा सिनेमा येत असून सर्वजण हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.