देओल कुटुंबातील स्त्रियांना सिनेमात काम करण्याची परवानगी नाही...अभय देओलचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 15:41 IST2024-11-10T15:39:03+5:302024-11-10T15:41:50+5:30
अभय देओलने नुकतंच देओल कुटुंबातील स्त्रियांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

देओल कुटुंबातील स्त्रियांना सिनेमात काम करण्याची परवानगी नाही...अभय देओलचा मोठा खुलासा
अभय देओल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. 'देव डी', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'ओए लकी लकी ओए' अशा सिनेमांमधून अभय देओलने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभय हा धर्मेंद्र, सनी, बॉबी यांच्या देओल कुटुंबांचा एक सदस्य आहे. अभयने बॉलिवूडमध्ये एकामागून एक लोकप्रिय सिनेमे देत असला तरीही तो लाईमलाईटपासून दूरच असतो. तो कोणत्याही पार्टी, इव्हेंटला दिसत नाही. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अभयने देओल कुटुंबाबद्दल एक मोठं विधान केलंय.
देओल कुटुंबातील स्त्रियांबद्दल काय म्हणाला अभय?
अभय देओल फिल्मफेअरसोबत दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "लहान वयातच मला फिल्मी दुनियेबद्दल कळालं होतं. कारण काका, भावंडं सर्वजण याच क्षेत्रात होतं. आम्ही एकत्र कुटुंबात वाढलोय. त्यामुळे आम्ही कायम घरातील संस्कारांचं पालन केलंय. आम्ही कायम फिल्मी इंडस्ट्रीतील झगमगाटापासून दूरच राहिलो. आमच्या घरातील स्त्रिया काम करु शकतात पण सिनेमात काम करण्याची त्यांना परवानगी नाही." असं अभय देओल म्हणाला.
अभय देओलचं वर्कफ्रंट
अभय देओलच्या सिनेमांबद्दल सांगायचं तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'देव डी', 'मनोरमा सिक्स फिट अंडर', 'रांझणा', 'एक चालीस की लास्ट लोकल', 'ओए लक्की लक्की ओए' अशा सिनेमांमधून अभय देओलने त्याच्या अभिनयाची चुणुक दाखवली. अभय देओल आगामी 'जंगल क्राय' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या अभय वेबसीरिज आणि हिंदी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.