लाडक्या लेकीचं बारसं! अभिनेता रणदीप हुड्डाने केलं मुलीचं नामकरण, ठेवलंय 'हे' गोड नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:25 IST2026-04-10T11:22:46+5:302026-04-10T11:25:02+5:30

कुर्रर्रर्रर्र! बाळाचं नाव आहे...; बॉलिवूड अभिनेत्याने जाहीर केलं लाडक्या लेकीचं नाव, फोटोही केला शेअर 

abollywood actor randeep hooda and lin laishram announce their newborn baby girl name share special post | लाडक्या लेकीचं बारसं! अभिनेता रणदीप हुड्डाने केलं मुलीचं नामकरण, ठेवलंय 'हे' गोड नाव 

लाडक्या लेकीचं बारसं! अभिनेता रणदीप हुड्डाने केलं मुलीचं नामकरण, ठेवलंय 'हे' गोड नाव 

Randeep Hooda:बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि पत्नी लिन लैशराम यांच्या आयुष्यात यावर्षी एका गोड परीची एण्ट्री झाली.वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेता बाबा झाला.रणदीप आणि लिन यांनी  लग्नानंतर अडीच वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. १० मार्च २०२६ रोजी लिन लैशरामची प्रसूती झाली. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तेव्हापासून रणदीपचे चाहते त्याच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आसुसलेले होते. अशातच बाळाच्या जन्मानंतर महिनाभरातच  या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लहान मुलीची झलक शेअर केली आहे. तसंच त्यांच्या मुलीचं नावही जाहीर केलं आहे. 


गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी आई-बाबा झाल्याची खुशखबर शेअर केली आहे. विकी कौशल-कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी सोशल मीडियाद्वारे आई-बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली तसंच चिमुकल्या पाहुण्यांची खास नावंसुद्धा त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यात आता अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशरामने सुद्धा लाडक्या लेकीचं नाव सांगितलं आहे. 

आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर  शेअर केलेल्या फोटोमध्ये रणदीप आणि त्याची पत्नी लाडक्या लेकी सोबतचे गोड क्षण शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या लेकीच्या नावाची खास पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलंय, “आमच्या आयुष्याचा नवा आधार,  नाओमिका हुडा — ईश्वरी कृपा, स्वातंत्र्य आणि आकाशाप्रमाणे अमर्याद.” अशी खास पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसंत लेकीच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. रणदीप हुड्डाने आपल्या लेकीचं नाव नाओमिका असं ठेवलं आहे.

दरम्यान, रणदीप आणि लिन लैशरामच्या या पोस्टवर चाहते तसेट सेलिब्रिटींनी कमेंट करुन लहानग्या लेकीसाठी प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत. 

Web Title : रणदीप हुड्डा ने बेटी का नाम नाओमी रखा, पहली झलक साझा की।

Web Summary : रणदीप हुड्डा और लिन लैशराम ने अपनी बेटी का नाम नाओमी हुड्डा रखा, जिसका अर्थ है दिव्य कृपा और आकाश की तरह असीम। जोड़े ने सोशल मीडिया पर अपनी बच्ची के साथ प्यारे पल साझा किए, जिस पर खूब प्यार और आशीर्वाद मिला।

Web Title : Randeep Hooda names his daughter Naomi, shares first glimpse.

Web Summary : Randeep Hooda and Lin Laishram revealed their daughter's name, Naomi Hooda, meaning divine grace and limitless like the sky. The couple shared adorable moments with their baby girl on social media, receiving love and blessings.