'मद्रास कॅफे'मधून बाहेर पडताना थोडक्यात वाचला अभिषेक बच्चन, शटरच डोक्याला लागलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:50 IST2025-02-04T12:49:39+5:302025-02-04T12:50:01+5:30

कॅफेमधून बाहेर येताना अभिषेक बच्चन थोडक्यात वाचला. नक्की काय झालं बघा.

Abhishek Bachchan s video outside madras cafe matunga viral on social media | 'मद्रास कॅफे'मधून बाहेर पडताना थोडक्यात वाचला अभिषेक बच्चन, शटरच डोक्याला लागलं अन्...

'मद्रास कॅफे'मधून बाहेर पडताना थोडक्यात वाचला अभिषेक बच्चन, शटरच डोक्याला लागलं अन्...

अभिनेता अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) नेहमीच आपण शांत, संयमी असंच पाहिलं आहे. नुकतीच त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत भारत विरुद्ध इंग्लंड टी २० सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेले होते. दोघांच्या उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या सामन्यानंतर अभिषेक बच्चनने मित्रासोबत माटुंगा येथील प्रसिद्ध मद्रास कॅफेमध्ये गेला होता. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. दरम्यान कॅफेमधून बाहेर येताना अभिषेक बच्चन थोडक्यात वाचला. नक्की काय झालं बघा.

अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याने टीम इंडियाची जर्सी घातली आहे. बंटी वालियासोबत तो माटुंग्याच्या मद्रास कॅफेमधून बाहेर पडत आहे. कॅफेबाहेर बरेच चाहते आणि पापाराझी दिसत आहेत. दरम्यान अभिषेक बाहेर येत असताना कॅफेचं शटरच खाली येतं आणि अभिषेकची उंची जास्त असल्यामुळे ते त्याच्या डोक्याला लागतं. प्रसंगावधान राखत मागे उभा असलेला माणूस पटकन शटर वर करतो. काही सेकंदाच्या या व्हिडिओत अभिषेक अक्षरश: थोडक्यात बचावताना दिसला आहे. नाहीतर त्याला गंभीर दुखापतही होऊ शकली असती.


या प्रकारानंतरही अभिषेक अजिबातच चिडलेला दिसत नाही. उलट तो हसतच सर्वांना हात करतो आणि तिथून जातो. मात्र तरी कमेंट्समध्ये अनेकांनी त्याच्याबद्दल काळजीही व्यक्त केली आहे. अभिषेकच्या या कृतीचं सगळेच कौतुक करत आहेत. 

अभिषेकचा नुकताच 'आय वॉन्ट टू टॉक' हा सिनेमा रिलीज झाला होता. शूजित सरकारच्या या सिनेमात त्याने भूमिका साकारली. सिनेमा बॉक्सऑफिसवर मात्र आपटला. तरी अभिषेकच्या अभिनयाचं कौतुक झालं.

Web Title: Abhishek Bachchan s video outside madras cafe matunga viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.