Networth: कोटयवधींचा मालक आहे अभय देओल, कमाईच्या बाबतीत सनी अन् बॉबीवर करतोय मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:41 IST2026-03-16T10:39:25+5:302026-03-16T10:41:39+5:30
Abhay deol: अभयने आजवरच्या कारकिर्दीत बरेच गाजलेले सिनेमा दिले. मात्र, असं असतांनाही तो लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो.

Networth: कोटयवधींचा मालक आहे अभय देओल, कमाईच्या बाबतीत सनी अन् बॉबीवर करतोय मात
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला कलाकार म्हणजे अभय देओल. 'देव डी', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'ओए लकी लकी ओए' अशा सिनेमांमधूनअभय देओलने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभयने फार निवड सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, असं असतांनाही कमाईच्या बाबतीत तो सनी, बॉबी देओल या दोन्ही भावंडांवर मात करतो.
अभयने आजवरच्या कारकिर्दीत बरेच गाजलेले सिनेमा दिले. मात्र, असं असतांनाही तो लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. मात्र, तरीदेखील या ना त्या कारणावरुन त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. अभयने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला असून त्याच्या करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.
किती आहे अभयचं नेटवर्थ?
'लाइफस्टाइल एशिया आणि मीडियम'नुसार, कमाईच्या बाबतीत अभय, सनी आणि बॉबी देओलवर मात करतो. अभयचं नेटवर्थ 400 कोटी रुपये इतकी असून दरवर्षी तो जवळपास 10 कोटींची कमाई करतो. या कमाईतील सर्वात जास्त रक्कम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील सिनेमांमधून मिळते.
अभय देओलची अन्य प्रॉपर्टी आणि बिझनेस
अभयने त्याच्या कमाईची गुंतवणूक बिझनेस आणि प्रॉपर्टीमध्ये केली आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीलाच 'The Fatty Cow' या नावाने एक रेस्टॉरंट सुरु केलं आहे. विशेष म्हणजे आजदेखील हे रेस्टॉरंट उत्तमरित्या सुरु आहे. तसंच त्याची 'Forbidden Films' ही प्रोडक्शन कंपनीदेखील आहे. अभयने मुंबईत जवळपास १२७ कोटींचं आलिशान घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत सध्याच्या घडीला दुप्पट आहे. इतकंच नाही तर त्याचं मुंबईतील अन्य ठिकाणी आणि पंजाबमध्येही प्रॉपर्टीज आहेत. सोबतच त्याने गोव्यामध्येही इको-फ्रेंडली ग्लास हाऊसदेखील बांधलं आहे. दरम्यान, अभयच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचं झालं तर 'बन टिक्की' आणि 'ट्रायल बाय फायर' या सीरिजमध्ये झळकला होता.