आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 14:48 IST2023-12-17T14:47:25+5:302023-12-17T14:48:09+5:30
नशेत असलेला एक दुचाकीचालक आयुषच्या गाडीला धडकला.

आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक
सलमान खानचा (Salman Khan) जीजा अभिनेता आयुष शर्मा (Ayush Sharma) याच्या गाडीचा अपघात झाला आहे. नशेत असलेला एक दुचाकीचालक आयुषच्या गाडीला धडकला. तेव्हा आयुष गाडीत नव्हता तर त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. खारमधील जिमखाना परिसरात ही घटना घडली. आयुष शर्माचा ड्रायव्हर ठीक असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत गाडीमध्ये केवळ आयुषचा ड्रायव्हर होता. सीएनजी भरण्यासाठी तो पंपावर जात होता. तेव्हाच एक दुचाकीस्वार त्याच्या कारला धडकला. यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. तसंच अजूनपर्यंत या दुर्घटनेबाबत आयुष शर्माकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.
आयुष शर्माने 2018 साली 'लव्हरात्री' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर त्याने सलमान खानसोबत 'अंतिम' सिनेमात भूमिका साकारली. लवकरच तो आगामी 'रुसलान' या अॅक्शन सिनेमात दिसणार आहे. आतापर्यंत आयुषला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्याचा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून आयुषसा बऱ्याच अपेक्षा आहेत.