"मी दीड वर्ष दारु पिऊन स्वतःला..."; आमिर खानने सांगितला वाईट अनुभव, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:41 IST2025-03-23T12:40:54+5:302025-03-23T12:41:21+5:30

आमिर खानने डिप्रेशनचा वाईट अनुभव नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. काय म्हणाला मिस्टर परफेक्शनिस्ट? (aamir khan)

Aamir Khan talks about his bad experience with depression after divorce with reena dutta | "मी दीड वर्ष दारु पिऊन स्वतःला..."; आमिर खानने सांगितला वाईट अनुभव, काय होतं कारण?

"मी दीड वर्ष दारु पिऊन स्वतःला..."; आमिर खानने सांगितला वाईट अनुभव, काय होतं कारण?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानला (aamir khan) ओळखलं जातं. आमिरचे सिनेमे म्हणजे सुपरहिटची गॅरंटी असं समजलं जातं. पण आमिरचे मागील दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे आमिरच्या सुपरहिट करिअरला काहीसा ब्रेक लागला. याचवेळी आमिरच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच गोष्टी घडल्या. अशातच आमिरने एका मुलाखतीत त्याने केलेला नैराश्याचा सामना आणि दारुचं व्यसन याविषयी दीर्घ खुलासा केला.

मी स्वतःला बर्बाद करत होतो: आमिर 

आमिरने अलीकडेच इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "रीना आणि माझं जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा पुढील २-३ वर्ष मी दुःखात होतो. मी कोणतंच काम करत नव्हतो किंवा नवीन स्क्रीप्ट ऐकत नव्हतो. मी घरी एकटा असायचो. त्या काळात तब्बल दीड वर्ष मी खूप दारु प्यायलो. मी त्याआधी कधीही दारुला स्पर्शही केला नव्हता. परंतु रीनापासून वेगळं झाल्यावर मला दारुचं व्यसन लागलं."

"मला रात्री झोप यायची नाही म्हणून मी दारु पिणं सुरु केलं. याआधी दारुच्या थेंबालाही स्पर्श न करणारा मी त्याकाळात एका दिवसात संपूर्ण बाटली रिकामी करायचो. देवदास सारखं मी स्वतःला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत होतो. मी दीड वर्ष याच मनस्थितीमध्ये होतो. मी अत्यंत वाईट अशा डिप्रेशनचा सामना करत होतो. पण त्यानंंतर मी स्वतःला सावरलं. जो व्यक्ती माझ्या आयुष्यात आधी होता तो आता नाहीये, याचा स्वीकार केला पाहिजे." अशाप्रकारे आमिरने पहिली पत्नी रीनाशी वेगळं झाल्यानंतर आलेला अनुभव शेअर केला. सध्या आमिर त्याची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटमुळे चर्चेत आहे.
 

Web Title: Aamir Khan talks about his bad experience with depression after divorce with reena dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.