प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीच्या बारश्याला पोहोचला आमिर खान, ठेवलं हे खास नाव
By देवेंद्र जाधव | Updated: July 7, 2025 11:30 IST2025-07-07T11:29:40+5:302025-07-07T11:30:45+5:30
लोकप्रिय अभिनेत्याने लेकीचं केलं बारसं, आमिर खानने ठेवलं हे खास नाव. त्यामुळे चाहत्यांनी आमिरने केलेल्या या कृतीचं कौतुक केलंय

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीच्या बारश्याला पोहोचला आमिर खान, ठेवलं हे खास नाव
तमिळ अभिनेता विष्णु विशाल आणि माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हे सध्या चर्चेत आहेत. विष्णु आणि ज्वाला यांच्या लेकीचं बारसं झालं. नामकरण समारंभात खास पाहुणा म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खान हजर होता. विशेष म्हणजे आमिरनेच या चिमुकल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी आमिरचं कौतुक केलंय. आमिरच्या खास उपस्थितीने विष्णु आणि ज्वालाच्या लेकीच्या बारश्याला चार चाँद लागले आहेत. जाणून घ्या
आमिरने ठेवलं हे खास नाव
आमिरचे विष्णु आणि ज्वालासोबत खास संबंध आहेत. त्यामुळे बारश्याचा हा समारंभ अगदी खास आणि भावनिक होता. विष्णु आणि ज्वालाने त्यांच्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करत 'आमिरने लेकीचं नाव ठेवलंय', असा खुलासा केला. आमिर खानने मुलीचं 'मीरा' नाव सुचवलं आणि ते कुटुंबाने आनंदाने स्वीकारलं, असं त्यांनी सांगितलं. या फोटोमध्ये आमिरने दोघांच्या मुलीला कडेवर घेतलं असल्याचं पाहायला मिळतं.
ज्वाला गुट्टाने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “आमची मीरा! आमिरशिवाय हा क्षण पूर्ण झाला नसता. सुंदर नावासाठी मनापासून धन्यवाद. आमचं तुझ्यावर प्रेम आहे.” विष्णु विशालनेही लिहिलं, “आमच्या बाळाचं नाव मीरा ठेवल्याबद्दल आमिर खान सरांचे मनापासून आभार. त्यांनी आमच्यासोबत हैदराबादला येऊन हा खास क्षण शेअर केला, याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं.” विष्णु आणि ज्वालाच्या मुलीचा जन्म २२ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. आमिरने सुचवल्याने त्यांनी लेकीचं नाव नाव ‘मीरा’ ठेवलं. आमिर खान आणि विष्णु विशाल यांच्यातील मैत्री काही काळापासून वाढत गेली. अशा वेळी आमिरने त्यांच्या कुटुंबाच्या खास क्षणात हजेरी लावून नाव ठेवणं, ही नक्कीच खास गोष्ट आहे.