खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:08 IST2025-07-22T13:07:12+5:302025-07-22T13:08:00+5:30
Sonam Raghuvanshi : सोनमनेच प्रेमप्रकरणामुळे राजाची हत्या केल्याचं समोर आलं. या भयंकर घटनेवर चित्रपट बनवला जाऊ शकतो अशा बातम्या येत आहेत. बॉलिवूडचा एक टॉप अभिनेता याबद्दल प्लॅनिंग करत आहे.

खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
सोनम रघुवंशी पती राजा रघुवंशीसोबत हनिमूनसाठी मेघालयला गेली होती. यानंतर हे कपल अचानक बेपत्ता झालं. त्यांच्या खूप शोध घेण्यात आला. पण काही दिवसांनी सोनमनेच प्रेमप्रकरणामुळे राजाची हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणी सोनमला अटक करण्यात आली आहे. या भयंकर घटनेवर चित्रपट बनवला जाऊ शकतो अशा बातम्या येत आहेत. बॉलिवूडचा एक टॉप अभिनेता याबद्दल प्लॅनिंग करत आहे.
झूम आणि टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, मेघालय हनिमून हत्या प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातला ट्विस्ट धक्कादायक होता. आता अभिनेता आमिर खान त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आमिर खान या प्रकरणाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत'सितारे जमीन पर' नंतर आमिर खान या हत्या प्रकरणावर चित्रपट बनवण्याचा प्लॅन करू शकतो असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटात सोनम आणि राजाची भूमिका नेमकं कोण साकारणार? तसेच हा चित्रपट कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मे महिन्यात लग्नानंतर राजा आणि सोनम हनिमूनसाठी गेले होते. पण दोघेही नोंगरियाट गावाजवळून बेपत्ता झाले होते. यानंतर २ जून रोजी धबधब्याजवळ राजाचा मृतदेह सापडला. काही दिवस सोनम बेपत्ता होती. त्यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली. तिला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस चौकशीत सोनमने राजाची हत्या केल्याचं कबूल केलं. बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने सोनमने नवरा राजाचा काटा काढला. या हत्या प्रकरणात विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांनी सोनमला मदत केली. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
सोनम रघुवंशी २१ जूनपासून जेलमध्ये आहे, जेलमध्ये आता तिला एक महिना पूर्ण झाला आहे. एनडीटीव्हीला सूत्रांकडून सोनमशी संबंधित काही माहिती मिळाली आहे. गेल्या एका महिन्यापासून जेलमध्ये सोनमला भेटायला कोणीही आलेलं नाही, तिचा भाऊ, वडील, आई किंवा कोणीही ओळखीची व्यक्ती आलेली नाही. पण सोनमला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही, ती तिच्या कुटुंबातील सदस्यांची आठवणही काढत नाही. राजा रघुवंशीच्या हत्येबद्दल तिला अजिबात पश्चात्ताप नाही, ती जेलमध्ये कोणाशीही याबद्दल बोलत नाही.