प्रभासचा वाढदिवस सेलिब्रेट करताना झाली छोटीशी चूक, धोक्यात आले शेकडो जणांचे प्राण, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 00:03 IST2022-10-25T00:02:19+5:302022-10-25T00:03:04+5:30
Prabhas Birthday Accident: प्रभासच्या जन्मदिनी त्याचा खास चित्रपट ‘’बिल्ला’’ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने केलेल्या आगावूपणामुळे शेकडो लोकांचे प्राण संकटात सापडले.

प्रभासचा वाढदिवस सेलिब्रेट करताना झाली छोटीशी चूक, धोक्यात आले शेकडो जणांचे प्राण, अखेर...
हैदराबाद - दक्षिणेतील बाहुबली अभिनेता प्रभास याने २३ ऑक्टोबर रोजी त्याचा जन्मदिन साजरा केला. दरम्यान, प्रभासच्या जन्मदिनाचं औचित्य साधून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभासवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. प्रभासच्या जन्मदिनी त्याचा खास चित्रपट ‘’बिल्ला’’ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती.
मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने केलेल्या आगावूपणामुळे शेकडो लोकांचे प्राण संकटात सापडले. या चाहत्याने चित्रपटगृहात फटाका फोडला. त्यामुळे सिनेमागृहात आग लागली. ही आग वेगाने पसरू लागली. त्यात अनेक सिट जळाल्या. या आगीमुळे चित्रपटगृहात आलेल्या प्रेक्षकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे लोक सैरावैरा पळू लागले.
दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार प्रभासच्या ४३ व्या जन्मदिनाच्या खास प्रसंगी गोदावरी जिल्ह्यातील व्यंकटरामना थिएटर येथे प्रभासच्या बिल्ला या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी शेकडो चाहते चित्रपटगृहामध्ये आले होते.
त्यानंतर चित्रपटगृहात असलेल्या कुणीतरी व्यक्तीने तिथेच फटाका फोडला. त्यानंतर तिथे आग भडकली. पाहता पाहता ही आग खुर्च्यांमधून पसरू लागली. त्यामुळे चित्रपटगृहात पळापळ झाली. मात्र ही आग वेळीच नियंत्रणात आण्यात आली. तिथे असलेल्या लोकांनी अग्निशमन दलाला खबर दिली. दरम्यान, आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.