3 इडियट्स: 'सिनेमात दाखवलंय तसा मी अजिबात नाही'; 14 वर्षानंतर रिअल लाइफ रँचोची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:07 IST2024-02-06T14:06:39+5:302024-02-06T14:07:36+5:30

3 idiots: '3 इडियट्स' या सिनेमात आमिरने रँचो ही भूमिका साकारली असून हा सिनेमा Sonam Wangchuk यांच्या जीवनावर आधारित आहे.

3-idiots-aamir-khan-character-sonam-wangchuk-reveals-why-he-cant-connect-to-rancho | 3 इडियट्स: 'सिनेमात दाखवलंय तसा मी अजिबात नाही'; 14 वर्षानंतर रिअल लाइफ रँचोची प्रतिक्रिया

3 इडियट्स: 'सिनेमात दाखवलंय तसा मी अजिबात नाही'; 14 वर्षानंतर रिअल लाइफ रँचोची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) कायम त्याच्या दर्जेदार सिनेमांसाठी ओळखला जातो. आमिर अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने त्याच्या सिनेमांची निवड करत असतो. त्यामुळे त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट या नावानेही ओळखला जातो. आजवर आमिरचे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 3 इडियट्स(3 idiots) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं. या सिनेमात आमिरने रँचो ही भूमिका साकारली होती. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. विशेष म्हणजे अलिकडेच Sonam Wangchuk यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रिअल लाइफपेक्षा पडद्यावर दाखवलेला रँचो खूप वेगळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

3 इडियट्स हा सिनेमा Sonam Wangchuk यांच्या जीवनावर आधारित  या सिनेमात अभिनेता आमिर खान याने मुख्य भूमिका साकारली आहे. अलिकडेच सोनम यांनी द लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेमातील भूमिका माझ्या रिअल लाइफसोबत तंतोतंत जुळत नसल्याचं म्हटलं.

तुम्ही आमिर खानचा '3 इडियट्स' हा सिनेमा पाहिला का? असा प्रश्न सोनम वांगचुक यांना विचारण्यात आला. त्यावर, "हो. पाहिलाय मी तो सिनेमा. छान आहे. त्यातून सुरेख संदेश देण्यात आला आहे. पण सिनेमात जसं दाखवलंय तसा मी अजिबातच नाहीये", असं सोनम वांगचुक म्हणाले.

दिग्दर्शकांसमोर आमिरची नवीन अट; 'सिनेमात रोमँटिक सीन करेन पण...'

पुढे ते म्हणतात, "मी तरी काय बोलू कोणीतरी मला सांगून ठेवलंय की, सिनेमात जे दाखवलंय त्याच्यापेक्षा कैकपटीने मी जास्त हुशार आहे असं बोला." सोनम वांगचुक यांनी हे मजेशीर अंदाजात यावेळी म्हटलं. परंतु, त्यांच्या या विधानाची बरीच चर्चा सध्या रंगली आहे.

दरम्यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित 3 इडियट्स हा सिनेमा २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. विधू विनोद चोप्रा निर्मित या सिनेमात आमिर खान, आर, माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आणि बमन इराणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
 

Web Title: 3-idiots-aamir-khan-character-sonam-wangchuk-reveals-why-he-cant-connect-to-rancho