दिग्दर्शकांसमोर आमिरची नवीन अट; 'सिनेमात रोमँटिक सीन करेन पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:14 PM2024-02-06T13:14:17+5:302024-02-06T13:15:12+5:30

Aamir khan: 'यापुढे रोमँटिक सीन करेन पण..'; पडद्यावर रोमान्स करण्यापूर्वी आमिरने ठेवली नवीन अट

aamir-khan-wont-turn-18-onscreen-like-3-idiots-romantic-roles-only-if-they-suit-his-age | दिग्दर्शकांसमोर आमिरची नवीन अट; 'सिनेमात रोमँटिक सीन करेन पण...'

दिग्दर्शकांसमोर आमिरची नवीन अट; 'सिनेमात रोमँटिक सीन करेन पण...'

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) आज इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर त्याच्या प्रत्येक सिनेमाची निवड करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने विचार करतो. त्यामुळेच योग्य कथानकाची निवड केल्यामुळे त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतात. आजवर आमिरने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यात त्याच्या रोमँटिक भूमिकांना प्रेक्षक विशेष पसंती देतात. मात्र, या भूमिका करण्यापूर्वी आमिरने आता एक अट ठेवली आहे.

अलिकडेच आमिर 'न्यूज 18' च्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला पडद्यावर रोमान्स करण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने रोमँटिक सीन करण्यासाठी काहीच अडचण नाही. मात्र, एक अट असल्याचं त्याने सांगितलं.

"यापुढे आता तू रोमँटिक सिनेमांमध्ये काम करणार का?'' असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत, "जर सिनेमाची कथा रोमँटिक असेल तर  नक्कीच करेन. पण, या वयात रोमान्स फारसा कॉमन रहात नाही. सिनेमाच्या कथेतील कॅरेक्टरला मी सूट होत असेल तर नक्कीच मी तो सीन करेन. मला प्रत्येक जॉनरच्या चित्रपटात काम करायला आवडेल. फक्त माझ्या वयानुसार ते कॅरेक्टर मला सूट झालं पाहिजे. जर मला एखाद्या १८ वर्षाच्या मुलाची भूमिका दिली तर नक्कीच मी ती नाही करणार," असं आमिर म्हणाला.

दरम्यान, आमिरच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर २०२२ मध्ये त्याचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर तो फारसा कुठे दिसला नाही. मात्र, लेकीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा तो इंडस्ट्रीत कमबॅक करायच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: aamir-khan-wont-turn-18-onscreen-like-3-idiots-romantic-roles-only-if-they-suit-his-age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.