कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

By अमित इंगोले | Updated: October 29, 2020 11:29 IST2020-10-29T11:15:49+5:302020-10-29T11:29:21+5:30

दिग्दर्शक मधुर भांडारकर हा सोसायटीतील कटुसत्य पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखला जातो. त्याने या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि कंगनाच्या माध्यमातून फॅशन विश्वात काय काय होतं हे दाखवलं.

12 Years of Fashion : Kangana Ranaut speaks on equation with Priyanka Chopra | कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

कंगनाने सांगितलं, कसा होता 'फॅशन'मध्ये प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव!

कंगना रणौतचा गाजलेला सिनेमा 'फॅशन'ला आज १२ वर्षे पूर्ण झालीत. कंगना भलेही या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पण आजही तिच्या भूमिकेची आठवण काढली जाते. दिग्दर्शक मधुर भांडारकर हा सोसायटीतील कटुसत्य पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखला जातो. त्याने या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि कंगनाच्या माध्यमातून फॅशन विश्वात काय काय होतं हे दाखवलं.

या सिनेमाला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने ETimes सोबत कंगनाने बातचीत केली. तिने तिची भूमिका आणि प्रियांका चोप्रासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत सांगितले. कंगनाने सांगितले की, 'क्वीन', 'मणिकर्णिका' आणि 'तनु वेड्स मनु' मध्ये काम केल्यावर आजही लोक तिच्या फॅशनमधील भूमिकेबाबत बोलतात. (VIDEO: 'तेजस'च्या दिग्दर्शकासमोर रंगोली लागवले ठुमके, कंगना म्हणाली - ही तर हद्दच झाली....)

नॅशनल अवॉर्ड मिळेल अपेक्षा नव्हती

कंगनाने सांगितले की, 'गॅंगस्टर', 'मेट्रो' आणि 'वो लम्हे' केल्यानंतर तिला आणखी महिला प्रधान सिनेमे करायचे होते. ती म्हणाली की, 'फॅशन' मध्ये छोटा आणि सपोर्टिंग रोल होता. मला अजिबात कल्पना नव्हती की, या सिनेमासाठी तिला अवॉर्ड मिळेल. कारण याआधीही तिने काही स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिले होते'. (कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा)

प्रियांकासोबत काम करण्याचा अनुभव

प्रियांका चोप्रासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबात कंगनाने सांगितले की, प्रियांका लाजवाब आहे. त्यावेळी मी १९ वर्षांची होते तरी मोठी स्टार होते. मी तिला स्टार म्हणून बघत होते. कारण कॉलेज टाइममध्ये मी तिचे सिनेमे बघत होते. ती फार कूल होती. तिने मला लहान मुलीसारखं किंवा ज्युनिअरसारखं ट्रिट केलं नाही. मला ती एका मैत्रीणीसारखी वाटली. ती माझ्यासोबत जेवण शेअर करत होती आणि मला विचारत होती की, मी कशी दिसते? हे ठीक आहे ना? त्यामुळे मला ती माझ्या सिनिअरसारखी आणि मोठी स्टार असल्याचं जाणवलंच नाही'.
 

Web Title: 12 Years of Fashion : Kangana Ranaut speaks on equation with Priyanka Chopra