Kangana Ranaut shares video of Rangoli, Aksht dance infront of Tejas Director Sarvesh Mewara | VIDEO: 'तेजस'च्या दिग्दर्शकासमोर रंगोली लागवले ठुमके, कंगना म्हणाली - ही तर हद्दच झाली....

VIDEO: 'तेजस'च्या दिग्दर्शकासमोर रंगोली लागवले ठुमके, कंगना म्हणाली - ही तर हद्दच झाली....

कंगना रणौतने तिच्या आगामी 'तेजस' सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन  सर्वेश मेवाडा करणार आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे काही फोटो आणि मजेदार व्हिडीओ शेअर केले आहेत. कंगनाने याची झलक दाखवली की, ती तिच्या घरी पाहुण्यांना घरचं जेवण खाऊ घालून कसं एंटरटेन करत आहे.

कंगनाने सिनेमाचा दिग्दर्शक सर्वेशसोबत फोटो शेअर करत लिहिले की, 'सिनेमा करण्याचा सर्वात चांगला भाग हा आहे की,  तुम्ही अनेक चांगल्या आर्टिस्टना भेटता. 'तेजस'चा रायटर जो टॅलेंटचा खजिना आहे. त्याला भेटून चांगलं वाटलं'. (कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा)

सोबतच कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात डिनर इव्हिनिंगची झलक बघायला मिळते. कंगनाने लिहिले की, बहीण-भावाला मित्रांना एंटरटेन करण्यास सांगितलं तर त्यांनी तर जरा जास्तच केलं.

या व्हिडीओत कंगनाची बहीण रंगोली आणि भाऊ अक्षत जबरदस्त मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. व्हिडीओत कंगनाही डान्स करताना दिसत आहे. नुकतंच कंगनाच्या भावाचं लग्न झालं. यादरम्यान कंगना आणि तिच्या बहिणीचे फोटो व्हायरल झाले होते. (कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायव्यवस्थेवर टीका; वकिलाने केली खासगी तक्रार)

करण जोहरवर पुन्हा निशाणा

नुकताच कंगना पुन्हा एकदा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरची प्रॉडक्शन टीम सध्या शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या सिनेमाच्या शूटींगसाठी गोव्यात आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असतील. अशात एक रिपोर्ट समोर आला होता की, गेल्या महिन्यात शूटींगवेळी सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने कथितपणे गोव्यात घाण आणि कचरा केला होता.

हाच रिपोर्ट ट्विट करत कंगनाने लिहिले की, 'यांचं असंवेदनशील आणि बेजबाबदार वागणं भयावह आहे. फिल्म यूनिटमध्ये महिलांची सुरक्षा, चांगल्या मेडिकल सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या खाण्यासाठी कठोर नियम करण्याची गरज आहे. सरकारने या नियमांचं पालन करून घेण्याची जबाबदारी एका विभागाकडे देणं गरजेचं आहे'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut shares video of Rangoli, Aksht dance infront of Tejas Director Sarvesh Mewara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.