कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा

By अमित इंगोले | Published: October 28, 2020 10:13 AM2020-10-28T10:13:24+5:302020-10-28T10:13:32+5:30

करण जोहरची प्रॉडक्शन टीम सध्या शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या सिनेमाच्या शूटींगसाठी गोव्यात आहे.

Kangana Ranaut targets Karan Johar production team for allegedly littering in Goa | कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा

कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अलिकडे तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. कंगना सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांवर निशाणा साधत आहे. नुकताच कंगना पुन्हा एकदा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. 

करण जोहरची प्रॉडक्शन टीम सध्या शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या सिनेमाच्या शूटींगसाठी गोव्यात आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असतील. अशात एक रिपोर्ट समोर आला होता की, गेल्या महिन्यात शूटींगवेळी सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमने कथितपणे गोव्यात घाण आणि कचरा केला होता.

हाच रिपोर्ट ट्विट करत कंगनाने लिहिले की, 'यांचं असंवेदनशील आणि बेजबाबदार वागणं भयावह आहे. फिल्म यूनिटमध्ये महिलांची सुरक्षा, चांगल्या मेडिकल सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या खाण्यासाठी कठोर नियम करण्याची गरज आहे. सरकारने या नियमांचं पालन करून घेण्याची जबाबदारी एका विभागाकडे देणं गरजेचं आहे'.

आधीच्या यासंबंधी एका ट्विटमध्ये कंगनाने लिहिले होते की, 'फिल्म इंडस्ट्री देशाचे नैतिक मूल्य आणि संस्कृतीसाठी केवळ एक व्हायरस नाही तर पर्यावरणासाठीही फार विनाशकारी आणि नुकसानकारक बनली आहे'. आपल्या या ट्विटमध्ये कंगनाने देशाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग करत लिहिले होते की, 'बघा कथित मठे प्रॉडक्शन हाऊसची घाण आणि त्यांचं बेजबाबदार वागणं. कृपया मदत करा'.

दरम्यान काही न्यूजमध्ये सांगण्यात आलं की सिनेमाच्या टीमने गोव्याची राजधानी पणजीपासून १० किलोमीटर दूर नेरूळ गावात खूप कचरा केला. पण अजूनही प्रॉडक्शन हाऊसकडून या प्रकरणावर काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही.
 

Web Title: Kangana Ranaut targets Karan Johar production team for allegedly littering in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.