'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:10 IST2025-05-07T17:10:10+5:302025-05-07T17:10:46+5:30
Movie on Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा रंगली. याच मिशनवर बॉलिवूडने सिनेमा बनवावा आणि त्या सिनेमात कोणाला कास्ट करावं, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे

'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
आज (बुधवार) रात्री १.३० च्या सुमारास भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. 'ऑपरेशन सिंदूर' असं या मिशनला (operation sindoor) नाव देण्यात आलं. या हल्ल्यात पाकिस्तानातील ९ दहशतवाद्यांची तळी उद्धवस्त करण्यात आली. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर सिनेमे बनवणाऱ्या बॉलिवूडने 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. इतकंच नव्हे बॉलिवूडने 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवला तर कोणत्या अभिनेत्याला कास्ट करण्यात यावं, याविषयीही नेटकऱ्यांनी सुचना दिल्या आहेत
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा आला तर
कोणत्याही घटनेच्या खोलात जाण्याचं काम नेटिझन्स करत असतात. अशातच नेटिझन्सने 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा आणण्याची मागणी बॉलिवूडकडे केलीय. 'उरी-द सर्जीकल स्ट्राईक', 'आर्टिकल ७०' सारखे सत्य घटनांवर आधारीत सिनेमे बॉलिवूडने बनवले. त्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर'ही बॉलिवूडने सिनेमा बनवावा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीय. याशिवाय या मिशनवर सिनेमा आला तर विकी कौशल, अक्षय कुमार, जॉन अब्राहम यांच्यापैकी कोणालातरी सिनेमात कास्ट करावं, असंही नेटकऱ्यांनी सुचवलं आहे.
Dear Bollywood, whosoever will turn Operation Sindoor into a movie; it’s my humble request to cast Vicky Kaushal as the lead! Pretty please 🐣
— Vee (@chotifataakdi) May 7, 2025
The Aditya Dhar movie on Operation Sindoor is going to be glorious pic.twitter.com/ZwR6IAzwgv— Shambhav Sharma (@shambhav15) May 7, 2025
याआधीही सत्य घटनांवर बनलेत सिनेमे
बॉलिवूडने याआधी सत्य घटनांवर आधारीत सिनेमे बनवले आहेत. हृतिक रोशनचा 'लक्ष्य', सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेहशाह', विकी कौशलचा 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', अनिल कपूर-हृतिक रोशनचा 'फायटर' हे सिनेमे सत्य घटनांवर आधारीत आहे. या सर्व सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मागणीनुसार आगामी काळात 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा आला तर आश्चर्य वाटायला नको. याशिवाय या सिनेमात कोणता अभिनेता झळकणार, याचीही उत्सुकता आहेच.