खूपच गोड! आलिया भटने विकी अन् कतरिनाच्या लेकासाठी पाठवली प्रेमाची भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:28 IST2026-02-20T11:24:49+5:302026-02-20T11:28:39+5:30
विहानसाठी आलियाची खास भेट, कतरिना कैफ फोटो शेअर करत म्हणाली...

खूपच गोड! आलिया भटने विकी अन् कतरिनाच्या लेकासाठी पाठवली प्रेमाची भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
Alia Bhatt Send Special Gift:बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कटरिना सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. आलियाची लेक राहा आता ३ वर्षांची झाली आहे. तर विकी-कतरिनाच्या घरी नुकतंच पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या लेकाचं नाव विहान असं ठेवलं आहे. दरम्यान, आलियाची लेक राहा कायमच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अशातच आलियाने तिची जिवलग मैत्रीण कतरिना कैफच्या लेकासाठी खास भेट पाठवली आहे. ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

बॉलिवूडच्या जगतात बऱ्याचदा कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्या पलीकडे मैत्री आणि आपुलकीचं नातं जपताना दिसतात. असाच एक गोड क्षण अलिकडेच घडला, तो म्हणजे आलिया भट्टने राजी सिनेमातील तिचा सहकलाकार विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मुलासाठी, विआनसाठी एक खास भेट पाठवली. या भेटवस्तूची एक झलक सोशल मीडियावर शेअर करून कतरिनाने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत हा सुंदर क्षण शेअर केला आहे.
आलिया ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेसवूमन देखील आहे. २०१२ मध्ये तिने हा बिझनेस सुरु केला होता.लहान मुलांच्या कपड्यांचा हा ब्रॅण्ड आहे. याच कलेक्शनमधील सुंदर असे कपडे ती इंडस्ट्रीतील कलाकारांच्या मुलांना भेटवस्तू स्वरुपात देत असते. विकी-कतरिनाच्या मुलासाठी पाठवलेल्या हॅम्परमध्ये एक मऊ आणि सशाचे खेळणं, एक मऊशार ब्लँकेट पाहायला मिळतेय. हा फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिलंय,"या खास वस्तुंसाठी धन्यवाद." अभिनेत्रीच्या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की तिला ही भेट खूप आवडली.