"खूप धावपळ अन् दगदग...", जान्हवी किल्लेकरची प्रकृती आता कशी? सूरजच्या लग्नाबद्दल म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:52 IST2025-12-04T11:48:39+5:302025-12-04T11:52:04+5:30
सूरज चव्हाणच्या लग्नानंतर तब्येत बिघडली, जान्हवी किल्लेकरने दिली हेल्थ अपडेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

"खूप धावपळ अन् दगदग...", जान्हवी किल्लेकरची प्रकृती आता कशी? सूरजच्या लग्नाबद्दल म्हणाली....
Janhvi Killekar Video:बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. गेले काही दिवस चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होती. अखेर सूरज त्याच्या मामाची मुलगी संजनासोबत विवाहबद्ध झाला. दरम्यान, सूरजच्या या लग्नकार्यात बिग बॉस मराठीमधील त्याची सहस्पर्धक जान्हवी देखील सहभागी झाली होती. त्याच्या प्रत्येक लग्नविधीला ती अगदी सावलीप्रमाणे गुलिगत किंगच्या पाठीशी उभी होती. बिग बॉस मध्ये जोडलेलं मैत्रीचं नातं ती अगदी पावलोपावली निभावताना दिसली. मात्र,या लग्नसोहळ्यानंतर जान्हवीची प्रकृती बिघडली. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.
सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात अॅडमिट झाली होती. त्यानंतर तिचे चाहते देखील चिंतेत होते. आता स्वत जान्हवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हेल्थ अपडेट दिली आहे. जान्हवीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "नमस्कार, व्हिडीओ बनवण्याचं कारण असं की, आता मी पूर्णपणे बरी झालीय. फार काही झालं नव्हतं. खरंतर बरेच दिवस शूटिंग, इव्हेंट्स होते, सूरजचं लग्न होतं. त्यामुळे खूप धावपळ आणि दगदग झाली. खूप प्रवास झाला. शिवाय जेवणाच्या वेळा चुकल्या, झोप पूर्ण नाही."
पुढे जान्हवी म्हणाली, "सूरजच्या लग्नात मी खूप मजा केली… खूप नाचले. त्यामुळे जरा थकवा आला होता. मला लो बीपीचाही त्रास आहे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण,मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचंय, कारण आज इतक्या मोठ्या प्रमाणातसूरजच्या लग्नाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती. फक्त त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी खूप लोक आले होते. आज सूरजचे आई-बाबा या जगात नाहीयेत, पण मला हे सांगताना खूप अभिमान वाटतोय की, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली. जे त्याचे आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र बनून आलेले. हे खूप कौतुकास्पद आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं. जे आमच्या सूरजला मिळालं आहे. खरंच मी महाराष्ट्रातील लोकांना धन्यवाद म्हणेन.
माझ्या आयुष्यातील क्षण अविस्मरणीय क्षण...
"सूरजच्या लग्नात मला खूप मजा आली. त्याचबरोबर मला त्यांचे काही रितीरिवाज कळले, काही पद्धती आमच्याकडे होत नाहीत त्या त्यांच्याकडे होतात. त्यांच्या प्रत्येक विधी मी एन्जॉय केल्या, खूप मजा आली, खूप नाचले, धमाल केली. सूरज आणि माझं बॉण्डिंग आता इतकं घट्ट झालंय की, मी प्रत्येक विधीला त्याच्यासोबत होते. खरंच हा माझ्या आयुष्यातील क्षण अविस्मरणीय क्षण होता. सूरजसोबत मलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं, बरेच नवीन मिळाले, सूरजच्या बहिणी मला मला माझ्या बहिणींसारख्याच आहेत. अनेक नवी नाती मला मिळाली, वेगवेगळ्या विधी समजल्या. अशा भावना तिने या व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या आहेत.