'कोकण हार्डेट गर्ल' अंकिता वालावलकरने स्वित्झर्लंडमध्ये लूटला 'Snowfall' चा आनंद, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:21 IST2025-05-29T14:18:58+5:302025-05-29T14:21:36+5:30
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हे नाव घराघरात पोहोचलं.

'कोकण हार्डेट गर्ल' अंकिता वालावलकरने स्वित्झर्लंडमध्ये लूटला 'Snowfall' चा आनंद, व्हिडीओ व्हायरल
Ankita Walawalkar: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हे नाव घराघरात पोहोचलं. अलिकडेच अंकिताने फेब्रुवारी महिन्यात मराठी संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यात आता लग्नाच्या काही महिन्यानंतर 'कोकण हार्टेड' गर्ल तिचा नवरा कुणाल भगतसोबत परदेशवारीला निघाली आहे. सध्या अंकिता तिच्या फॉरेन ट्रीपमुळे चर्चेत आहे.
अंकिता वालावलकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. सध्या ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इंटरनॅशनल ट्रीपचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते आहे. नुकताच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वित्झर्लंडमध्ये स्नो-फॉलचा आनंद लूटताना दिसते आहे. शिवाय ती प्रचंड खुश देखील असल्याचं पाहायला मिळतंय.
सध्या अंकिता तिची परदेशवारी एन्जॉय करताना दिसते आहे. डिस्नेलँड तसेच लंडन, न्यॅयॉर्क यांसारख्या शहरांमध्ये ती तिच्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसली. त्यामुळे आता अंकिता-कुणाल पुढे परदेशात कुठे फिरणार याबद्दल जाणूस घेण्यास प्रेक्षक देखील आतुर आहेत.