Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:53 IST2024-09-25T18:38:46+5:302024-09-25T18:53:46+5:30
Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : सूरज चव्हाणने वरातीमधला गमतीदार किस्सा सांगितला आहे.

Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन विविध कारणांमुळे गाजला. हा सीझन १०० दिवस नाही तर ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळेच हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसने देखील यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा करत यंदाचा सीझन १० आठवडे सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. याच दरम्यान आता सूरज चव्हाणने वरातीमधला गमतीदार किस्सा सांगितला आहे.
सूरज पॅडी दादांना म्हणतो, "गावात वरात असते, डीजेची वरात असते, नवरा घोड्यावर बसतो आणि घोडा नाचतो. घोड्याचे पाय वर जातात. एकदा काय झालं, घोड्याने पाय वर केले आणि पलटीच झाला. माणसाच्या अंगावर पडला... माणूस दबला गेला. त्या माणसाला खूप लागलं होतं. लग्न सुरू होतं. लग्नात घोडा नवऱ्याला घेऊन नाचत होता आणि मध्येच घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला."
"नवरा आणि घोडा परत आलाच नाही. नवरा एकीकडे पडलेला सापडला." त्यावर पॅडी दादांनी "तुझ्याच गावाकडे कसे असे किस्से" असं म्हटलं आहे. गावामध्ये वरातीत घडलेले मजेशीर किस्से सांगताना सूरजला फार हसू येत होतं. बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून तब्बल २५ लाख रुपये मिळणार आहेत. मात्र यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे.
घरातील सदस्यांना बक्षिसाची ही रक्कम जिंकण्यासाठी एक महाचक्रव्युह टास्क खेळावा लागणार आहे. कल्रर्सने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये या सीझनच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम आहे २५ लाख रुपये. ही रक्कम कमावण्यासाठी मी आणलाय या सीझनमधील सर्व टास्कचा बाप... महाचक्रव्युह असं बिग बॉसने म्हटल्याचं पाहायला मिळत आहे.