Bigg Boss फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, एअरबॅग्ज निकामी, कारचा झाला चक्काचूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:24 IST2025-12-09T10:19:41+5:302025-12-09T10:24:18+5:30
बिग बॉस फेम अभिनेत्याचा भयंकर अपघात झाला आहे.

Bigg Boss फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, एअरबॅग्ज निकामी, कारचा झाला चक्काचूर!
Zeeshan Khan Car Accident: "कुमकुम भाग्य" आणि "नागिन" सारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला टेलिव्हिजन अभिनेता झीशान खान एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील अंधेरी वर्सोवा परिसरात त्याचा भीषण रस्ते अपघात झाला.
सोमवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. वृत्तानुसार, झीशान खानची कार दुसऱ्या एका कारला धडकली, ज्यामुळे जोरदार धडक बसली आणि कारचे एअरबॅग्ज निकामी झाले. कारचे मोठे नुकसान झाले असले तरी झीशान खान सुरक्षित आहे. अपघातानंतर झीशानने लगेचच जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची तक्रार नोंदवली. मात्र, त्याने अद्याप अपघाताबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
झीशान खान हा टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तो "कुमकुम भाग्य", "नागिन" आणि "बागीन" सारख्या शोमध्ये दिसला आहे. तसेच, त्याने "बिग बॉस ओटीटी सीझन १" आणि "लॉक अप" सारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.
ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात
गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या ऑनस्क्रीन आईसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत आला होता. कुमकुम भाग्य फेम रेहाना पंडित आणि झीशान हे पडद्यावर आई-मुलाची भूमिका साकारत असले तरी, वास्तविक जीवनात ते रिलेशनशिपमध्ये होते. रेहाना झीशानपेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे.