...और प्यार हो गया! सलमानमुळे झालं अर्पिता-आयुषचं लग्न; पाहा त्यांची फिल्मी स्टाइल लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 14:16 IST2021-10-26T14:16:07+5:302021-10-26T14:16:50+5:30
Arpita khan sharma: अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत (Aayush Sharm) लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांची लव्हस्टोरी फार मोजक्या जणांना माहित आहे.

...और प्यार हो गया! सलमानमुळे झालं अर्पिता-आयुषचं लग्न; पाहा त्यांची फिल्मी स्टाइल लव्हस्टोरी
बॉलिवूडमध्ये असे असंख्य कलाकार आहेत जे त्यांच्या प्रोफेशन लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान (salman khan). भाईजान म्हणून विशेष ओळखला जाणार सलमान अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. कधी त्यांच्या अफेअरमुळे तर कधी त्याच्या कुटुंबियांमुळे. सध्या सोशल मीडियावर सलमानच्या बहिणीची म्हणजे अर्पिताची (arpita khan sharma) चर्चा रंगली आहे. अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत (Aayush Sharm) लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांची लव्हस्टोरी फार मोजक्या जणांना माहित आहे. त्यामुळेच अर्पिता- आयुषची पहिली भेट कशी झाली ते जाणून घेऊयात.
कॉमन फ्रेंडमुळे झाली पहिली भेट
आयुष आणि अर्पिता यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाले. त्यावेळी हे दोघंही सिंगल होते. एका मुलाखतीत आयुषने या भेटीला किस्सा सांगितला आहे. आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी बऱ्याचदा अर्पिताच्या घरी जेवायला जात असू. अर्पिताच्या घरीचं जेवण सगळ्यांनाच आवडायचं त्यामुळे संधी मिळाली की आम्ही तिच्या घरी जेवायला जायचो. आमच्यातली मैत्री हळूहळू फुलायला लागली होती. आणि,त्याचवेळी मी अर्पिताच्या प्रेमात पडलो. त्यावेळी मी फारसा वेळ न दवडता तिला लग्नाची मागणी घातली आणि तिनेही मला होकार दिला.
सलमानशी बोलताना वाटायची भीती
"आपल्या गर्लफ्रेंडच्या भावासोबत बोलताना अनेकांची गाळण उडते. विचार करा माझी काय अवस्था झाली असेल. पण, सलमानसोबत माझी पहिली भेट चांगली झाली. सलमानने मला माझ्याविषयी काही गोष्ट विचारल्या. त्यावेळी मी २४ वर्षांचा होता आणि अर्पिता २६. सलमान त्यावेळी मला म्हणाला होता. जर तुमचं प्रेम खरं असेल आणि तुम्ही सोबत आनंदात रहणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे, " असं आयुषने सलमानसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगितलं.
दरम्यान, आयुष कलाविश्वात येण्यापूर्वी त्याचा फॅमेली बिझनेस सांभाळत होता. त्यानंतर सलमानच्या लवयात्री या चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर आयुष लवकरच 'अंतिम : द फाइनल ट्रूथ' या चित्रपटात झळकणार आहे.