Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:35 IST2026-04-13T17:31:24+5:302026-04-13T17:35:57+5:30

शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावुक प्रसंगी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज गायक अनुप जलोटा, सुदेश भोसले, शान यांनी गाणं गाऊन आशाताईंना स्वरांजली दिली.

Asha Bhosale last rites at shivaji park dadar singers tribute asha bhosale by singing songs | Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली

Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली

रविवार १२ एप्रिलला आशा भोसले यांचं निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनामुळे संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली. आज शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावुक प्रसंगी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज गायक अनुप जलोटा, सुदेश भोसले, शान यांनी गाणं गाऊन आशाताईंना स्वरांजली दिली. यावेळी सर्वांच्या डोळ्यांत पाणी होतं. 





आशा भोसले यांचा लेक आनंद भोसले यांनी आशाताईंच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यावेळी उपस्थित गायकांनी गाणं गात आशाताईंना शेवटचा निरोप दिला. आशाताईंची नात जनाईच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कुटुंबिय तिला सावरताना दिसले. आशाताईंचे लेक आनंद हे सुद्धा ढसाढसा रडताना दिसले. आशाताईंचं जाणं हा त्यांच्या कुटुंबासाठी किती मोठा आघात आहे, हे स्पष्ट जाणवलं.

मराठी अभिनेता अभिजीत केळकरही या प्रसंगी हजर होता. अभिजीतचं आशाताईंशी खास नातं असल्याने त्यालाही अश्रू अनावर झाले होते. आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमिर खान, विकी कौशल, विवेक ओबेरॉय, पद्मिनी कोल्हापुरे हे कलाकारही हजर होते. सर्वांनी आशाताईंच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी (११ एप्रिल) आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Web Title : आशा भोसले का निधन; दिग्गज गायकों ने दी संगीतमय श्रद्धांजलि

Web Summary : आशा भोसले का 12 अप्रैल को 93 वर्ष की आयु में निधन हो गया। संगीत जगत में शोक की लहर दौड़ गई। अनुप जलोटा, सुदेश भोसले और शान ने शिवाजी पार्क में उनके अंतिम संस्कार में संगीतमय विदाई दी, जिससे सभी भावुक हो गए।

Web Title : Asha Bhosle Passes Away; Legendary Singers Pay Musical Tribute

Web Summary : Asha Bhosle passed away on April 12th at 93. A wave of grief swept the music world. Anup Jalota, Sudesh Bhosle, and Shaan offered a musical farewell at her funeral at Shivaji Park, moving everyone present.