मुंबई: चार दिवसांत बघता येणार तब्बल ४१ मराठी चित्रपट, तेही फुकट; कोणत्या चित्रपटांचा समावेश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:01 IST2025-04-16T09:00:55+5:302025-04-16T09:01:51+5:30
Marathi Film Festival 2025 Mumbai: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर येथे हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

मुंबई: चार दिवसांत बघता येणार तब्बल ४१ मराठी चित्रपट, तेही फुकट; कोणत्या चित्रपटांचा समावेश?
मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव–२०२५’ साजरा होणार आहे. महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या ४१ चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर येथे हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. उद्घाटन झाल्यानंतर राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाने सांगता होणार आहे.
कोणत्या दिवशी कोणते चित्रपट पाहता येणार?
२२ एप्रिल : सकाळी १० वाजता : ‘पाणी’, ‘बटरफ्लाय’, ‘येरे येरे पावसा’
दुपारी १ वाजता : ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’, ‘तिचं शहर होणं’
दुपारी ३ वाजता : ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’, ‘या गोष्टीला नावचं नाही’
सायंकाळी ६ वाजता : ‘गोदाकाठ’, पळशीची पीटी, ‘झॉलिवूड’
रात्री ८ वाजता : ‘भेरा’, विनोदी चित्रपट ‘चोरीचा मामला’, ‘पॉडीचेरी’
२३ एप्रिल : सकाळी १० वाजता : ‘बार्डे’, ‘गोदावरी’, ‘तेरव’
दुपारी १ वाजता : ‘स्थळ’, ‘गिरकी’, ‘शहिद भाई कोतवाल’
दुपारी ३ वाजता : ‘जयंती’, ‘गाभ’, ‘फनरल’
सायंकाळी ६ वाजता : ‘पोटरा’, ‘अमलताश’, ‘कुलुप’
रात्री ८ वाजता : ‘मी वसंतराव’, ‘बापल्योक’, ‘छबिला’
२४ एप्रिल : सकाळी १० वाजता : ‘स्वीट ॲण्ड शॉर्ट’, ‘रौंदळ’, ‘जुन फर्नीचर’
दुपारी १ वाजता : ‘मदार’, ‘पावनखिंड’, ‘कारखानिसांची वारी’
दुपारी ३ वाजता : ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘वाय’
सहभागी होण्यासाठी काय करायचं?
या महोत्सवात विषयांवरील व वेगळ्या धाटणीचे ४१ मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील. याकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू असून कार्यक्रमस्थळी ऑफलाइन नावनोंदणी देखील सुरू आहे.