"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
By कोमल खांबे | Updated: December 29, 2025 11:34 IST2025-12-29T11:32:04+5:302025-12-29T11:34:33+5:30
Prasad Jawade Mother Death: आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सासूबाईंच्या निधनानंतर प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक झाला आहे. प्रसादची आई प्रज्ञा जवादे यांचं रविवारी(२८ डिसेंबर) निधन झालं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गेली काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आईच्या निधनामुळे प्रसादवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सासूबाईंच्या निधनानंतर प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अमृता देशमुखने सासूबाईंसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये ती म्हणते, "पहिल्या दिवसापासून कधीच त्यांना मला सुनेसारखं वागवलं नाही. मी त्यांची मुलगीच होते. तुम्ही कोणत्या नावाने हाक मारता त्याला फारसं महत्त्व नाही. काकू/मम्मी... प्रेम सारखंच असतं. त्यांचं प्रेम हे निर्मळ, निरागस होतं. त्यांचं मराठी भाषा, कविता, शब्दांवर असलेलं प्रेम यामुळे आमच्यातील नातं घट्ट झालं होतं. दीर्घ संवाद, साध्या भावना आणि खोल अर्थ. त्यांचे घारे डोळे... प्रसादच्या फिक्या चॉकलेटी रंगाच्या डोळ्यांतही तीच भावना दिसते. तुम्ही ज्याप्रकारे मला सांभाळलं, प्रेम दिलं त्यासाठी खरंच आभारी आहे. नेहमीच तुमची मुलगी बनून राहीन. शेवटचं म्हणजे तुमचा मुलगा प्रसाद आणि पप्पांवर मला गर्व आहे. ज्याप्रकारे त्यांनी या प्रवासात तुमची साथ दिली ते शब्दांपलिकडे आहे".
अमृताने प्रज्ञा जवादे यांच्या मृत्यूची बातमी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून चाहत्यांना दिली होती. प्रसाद आणि त्याच्या आईचं फार घट्ट नातं होतं. आईसोबतचे फोटो प्रसाद शेअर करताना दिसायचा. अमृताचंही तिच्या सासूबाईंसोबत जवळचं आणि भावनिक नातं होतं हे तिने केलेल्या पोस्टवरुन स्पष्ट होतं.