डॉ. अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरु; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:36 IST2022-08-17T12:35:37+5:302022-08-17T12:36:51+5:30

Amol kolhe: डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असल्याचं सांगितलं.

amol kolhe news shocking things happening on social media in the name | डॉ. अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरु; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दिली माहिती

डॉ. अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरु; पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दिली माहिती

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा जितका सकारात्मक वापर होतो, तितक्याच काही नकारात्मक गोष्टीही घडतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया हॅण्डल हॅक झाल्याच्या वा त्यांच्या नावे फेक अकाऊंट सुरु केल्याच्या घटना कानावर पडल्या आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्या बाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असल्याचं सांगितलं. तसंच या अकाऊंटच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे सावध राहा, असंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. तसंच त्यांनी कायदेशीर तक्रारही दाखल केली आहे.

काय आहे डॉ. अमोल कोल्हे यांची पोस्ट?

@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या.

दरम्यान, अमोल कोल्हे उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक राजकीय व्यक्तीदेखील आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ते सक्रीय असून कायम  त्यांच्या दौऱ्यांविषयी वा विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती जनतेला देत असतात. त्यामुळे त्यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरु असून त्यातून जनतेची फसवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याविषयीची माहिती जनतेला दिली आहे.
 

Web Title: amol kolhe news shocking things happening on social media in the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.