बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:30 IST2025-12-22T11:30:18+5:302025-12-22T11:30:47+5:30
'बॉर्डर'नंतर पुन्हा एकत्र येतायेत अक्षय आणि सनी?

बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात अचानक पन्नाशी-साठीतल्या अभिनेत्यांचा भाव वधारला आहे. बॉबी देओल, सनी देओल आणि आता अक्षय खन्ना या अभिनेत्यांनी सध्याच्या हिंदी सिनेमांची रुपरेषाच बदलली आहे. खलनायकी भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं आहे.'धुरंधर', 'छावा' मधला अक्षय खन्ना, 'ॲनिमल' मधला बॉबी देओल असो किंवा 'गदर २'चा सनी देओल या तिघांकडे सध्या सिनेमांची रांग आहे. दरम्यान आता सनी देओल आणि अक्षय खन्ना हे दोन्ही चर्चेतील अभिनेते तब्बल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत.
सनी देओल आणि अक्षय खन्ना १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'मध्ये एकत्र दिसले होते. आता दोघंही तब्बल २९ वर्षांनंतर एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. अद्याप अधिकृतरित्या यावर कन्फर्मेशन आलेलं नाही. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्यांनी 'इक्का'सिनेमाचं शूट पूर्ण केल्याचा दावा केला आहे. याचा अर्थ दोघंही आगामी 'इक्का' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. जर हे खरं असेल तर अक्षय आणि सनीच्या चाहत्यांना नवीन वर्षात मोठं सरप्राईजच मिळेल.
'इक्का' हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा थेट ओटीटीवर रिलद केला जाणार आहे. सिनेमात या दोघांसोबत दिया मिर्जा, संजीदा शेख यांची मुख्य भूमिका आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
अक्षय खन्नाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्याकडे आणखी ५ चित्रपट आहेत जे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत. तर सनी देओलही आगामी 'बॉर्डर २','रामायणम्','इक्का' यासह काही सिनेमांमध्ये दिसणार आहे.