"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:06 IST2025-04-27T13:06:16+5:302025-04-27T13:06:33+5:30
'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारने पहलगाम हल्ला करणारा दहशतवाद्यांना चांगलंच सुनावलं असून. अक्षय कुमारचा राग अनावर झालेला दिसला. काय घडलं बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा

"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (akshay kumar) अलीकडेच आपल्या आगामी चित्रपट 'केसरी २'च्या (kesari 2) स्क्रीनिंगदरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे अक्षय कुमारनेही त्याचा संताप व्यक्त केला. 'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान समोर अनेक प्रेक्षक उपस्थित होते. सर्वांसमोर अक्षयने त्याचा राग व्यक्त केला.
अक्षय 'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय म्हणाला?
'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान अक्षय कुमारने उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधताना म्हटले, "दुर्दैवाने, आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनात संताप पुन्हा जागृत झाला आहे. तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे जाणता की मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. मी त्या दहशतवाद्यांना आम्ही एकच गोष्ट सांगू इच्छितो." असं म्हणत अक्षयने माईक प्रेक्षकांकडे फिरवला. तेव्हा सर्व प्रेक्षकांनी अक्षयच्या 'केसरी २' सिनेमातील डायलॉग म्हटला तो म्हणजे, "F**K You!" अशाप्रकारे 'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान अक्षयचा वेगळाच अवतार सर्वांना दिसला.
'केसरी २'ची चर्चा
या स्क्रीनिंगदरम्यान 'केसरी २' चित्रपटातील अक्षयचे सहकलाकार अर्थात आर. माधवन आणि क्रिश रावही उपस्थित होते. अक्षय कुमारच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि त्याच्या भावनांना पाठिंबा दिला. 'केसरी २' हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. ज्यात अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय.