Video: अविनाश नारकर is back! '३६ गुणी जोडी'तील अभिनेत्रींसह केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:38 IST2023-03-09T16:37:52+5:302023-03-09T16:38:32+5:30
Avinash narkar: अविनाश नारकर बऱ्याचदा काही मजेशीर रिल्स नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: अविनाश नारकर is back! '३६ गुणी जोडी'तील अभिनेत्रींसह केला डान्स
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अविनाश नारकर(avinash narkar). अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अविनाश सध्या ३६ गुणी जोडी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मालिका विश्वात वावरणारे अविनाश नारकर सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय आहेत. त्यामुळे बरेचदा ते त्यांचे डान्स व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
अविनाश नारकर बऱ्याचदा काही मजेशीर रिल्स नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. '३६ गुणी जोडी' या मालिकेतील आद्या आणि सारिकासोबत त्यांनी ताल धरला असून मस्त डान्स केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी अविनाश नारकर यांचं कौतुक केलं आहे.
अविनाश नारकरांचा अफलातून डान्स पाहिलात का? डान्सच्या बाबतीत पत्नी ऐश्वर्यालाही टाकलं मागे
दरम्यान, या वयातही अविनाश नारकर ज्या एनर्जीने डान्स करतात ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. इतकंच नाही तर गाण्याची प्रत्येक ओळ ते एन्जॉय करत असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.