शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात फक्त चोकर हवा!

By admin | Updated: April 7, 2017 19:16 IST

महागडे हार , नेकलेस, चेन हेच घातल्यावर गळा शोभून दिसतो असं नाही तर एक साधा चोकरही गळ्याला देखणेपणा देतो.

कापडापासून किंवा मेटलपासून बनवलेले गळ्यात घालायचे चोकर एकदम हटके लुक देतात. साधारणत: 70 ते 80 च्या दशकात हे चोकर एकदम इन होते. बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान, परवीन बाबी आणि त्यानंतरच्या काळात टीना मुनीम यांनी हे चोकर गळ्यात घालून मिरवले. नुसत्याच चित्रपटासाठी नव्हे तर हे चोकर त्यांचं स्वत:चंही स्टाइल स्टेटमेण्ट झालं होतं. प्लाझो पँट्स , मोठ्या गळ्याचे टॉप्स आणि त्यावर अन्य कोणत्याही दागिन्यांऐवजी चोकर एवढाच काय तो साझ असायचा. पण हा एवढाच चोकर त्यांच्या स्पेशल लूकची गरज पूर्ण करायचा.मधल्या काळात सिनेमातून आणि नेहेमीच्या वापरातून गायब झालेले हे चोकर हल्ली बाजारात पुन्हा नव्यानं दिसू लागले आहेत. किंबहुना त्याच धाटणीची गळ्यातली टॅटूस्टाईल आणि अँक्लेटही बाजारात उपलब्ध झाली आहेत. लेदर, वेलवेट, रिबनपासून हे चोकर बनवले जातात. इतकेच नव्हे तर स्टोन्स लावलेले सिल्व्हर कोटेड आणि मेटलचे देखील चोकर आॅकेजनली वापरले जातात. पारंपरिक दागिने पारंपरिक सणांना जितक्या हौसेनं घातले जातात त्याच हौसेनं वेस्टर्न ड्रेसेसवर हे चोकर परिधान करणाच्या ट्रेण्ड हल्ली फॅशन जगतात आहे. अलिकडे अनेक फॅशन इनस्टिट्यूट्समध्ये या चोकरवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचबरोबर अनेक फॅशन डिझायनर्सही या चोकर्सवर काम करत आहेत. वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेले हे चोकर म्हणूनच आज फॅशनची हौस असलेल्या अनेकींच्या गळ्यातले ताईत झाले आहेत.