शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

व्हॉट्सअ‍ॅपचा असाही प्रवास

By admin | Updated: June 19, 2016 02:14 IST

वयाच्या सोळाव्या वर्षी जॅन कोमला त्याच्या आईसोबत सरकारी मदतीवर मिळालेल्या घरात राहावे लागत होते. घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्याच्या आईला लहान मुलांना सांभाळण्याचे

- कुणाल गडहिरेवयाच्या सोळाव्या वर्षी जॅन कोमला त्याच्या आईसोबत सरकारी मदतीवर मिळालेल्या घरात राहावे लागत होते. घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्याच्या आईला लहान मुलांना सांभाळण्याचे पाळणाघरातील काम करावे लागत होते तर स्वत: जॅन कोम हा एका किराणा दुकानात सफाई कर्मचारी होता. याच जॅनने आज जागतिक पातळीवरील संवाद करण्याचे सर्वात मोठे, प्रभावी आणि स्वस्त माध्यम व्हॉट्सअ‍ॅप या मेसेंजर अ‍ॅप्लिकेशनची स्थापना केली आहे. आज जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे १०० कोटी वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा असाही प्रवास- कुणाल गडहिरेवयाच्या सोळाव्या वर्षी जॅन कोमला त्याच्या आईसोबत सरकारी मदतीवर मिळालेल्या घरात राहावे लागत होते. घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्याच्या आईला लहान मुलांना सांभाळण्याचे पाळणाघरातील काम करावे लागत होते तर स्वत: जॅन कोम हा एका किराणा दुकानात सफाई कर्मचारी होता. याच जॅनने आज जागतिक पातळीवरील संवाद करण्याचे सर्वात मोठे, प्रभावी आणि स्वस्त माध्यम व्हॉट्सअ‍ॅप या मेसेंजर अ‍ॅप्लिकेशनची स्थापना केली आहे. आज जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे १०० कोटी वापरकर्ते आहेत. ट्सअ‍ॅपच्या यशस्वी प्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. किशोरवयात एकीकडे प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत असताना जॅनने अमेरिकेतल्याच सॅन जोसे युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर विषयात प्रवेश घेतला. नेटवर्किंग या विषयात त्याने प्रावीण्य संपादन केलं आणि त्याच जोरावर याहूने त्याला तो शिकत असतानाच आपल्या कंपनीत इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअर म्हणून नोकरी दिली. एकदा याहूच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या आलेली असताना त्यांनी जॅनला मदतीसाठी फोन केला. मात्र तेव्हा तो कॉलेजमध्ये होता. त्या वेळी ती समस्या सोडवण्यासाठी त्याला कॉलेजमधून आॅफिसला जावे लागले. मात्र त्यानंतर त्याने याहूचा सहसंस्थापक असलेल्या डेविड फिलो याच्या सांगण्यावरून कॉलेज शिक्षण पूर्ण न करता करिअरवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर सुमारे ९ वर्षे तो याहूमध्ये कामाला होता. २००७ साली जॅनने त्याचा याहूमधील मित्र आणि सहकारी ब्रायन अक्टोनसोबत याहुमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर या दोघांनी फेसबुकमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना तेथे नोकरी नाकारण्यात आली. त्यानंतर जॅनने व्हॉट्सअ‍ॅप बनवण्यास सुरुवात केली आणि कंपनीची अधिकृत स्थापना केली. सुरुवातीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन अर्थात संवादाचे माध्यम नव्हते. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे निव्वळ फोन डिरेक्टरी होती, ज्यामध्ये तुमच्या मोबाइलमध्ये ज्यांचे मोबाइल क्रमांक आहेत त्यांच्या नावाखाली ते सध्या काय करत आहेत ही माहिती समजत होती. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपच्या आताच्या स्टेटस अपडेटप्रमाणे होती. मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे जग हे तेव्हा नव्यानेच आकार घेत होते आणि सुरुवातीच्या दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप अनेक वेळा तांत्रिक समस्येमुळे बंद पडत असे. एक काळ असा होता की जॅनने तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप बंद करून पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या वेळी ब्रायनने त्याला आणखी थोडा वेळ देण्यास सांगितले आणि ब्रायनने नंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आर्थिक गुंतवणूक केली तसेच तो सहसंस्थापकसुद्धा बनला. दरम्यान, अ‍ॅपलने आपल्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅप्लिकेशन बनवणाऱ्या लोकांना, त्यांचं अ‍ॅप्लिकेशन वापरत असणाऱ्या वापरकर्त्यांना एखादी माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आपण सध्या काय करत आहोत याची माहिती आपल्या सर्व मित्रांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचवता येत होती. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणारी व्यक्ती जेव्हा आपले स्टेटस बदलत असे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन हे त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या इतर मित्रांना समजत असे. आणि याचा वापर लोकांनी अतिशय कल्पकपणे करण्यास सुरुवात केली. एकंदरीतच ही छोटीशी कल्पना मित्रांमध्ये एकप्रकारे संवादाचे काम करत होती. यासाठी एखाद्या वेबसाइटवर अथवा अ‍ॅप्लिकेशनवर लॉगइन होण्याची अथवा अकाउंट सुरू करण्याची गरज नव्हती. हा संवाद विनामूल्य, विनाविलंब होत होता. याशिवाय लोकांचे एसएमएसचे पैसेसुद्धा वाचत होते. यामुळे दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने लोकांच्या या कल्पक वापराला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण अ‍ॅप्लिकेशन नवीन मेसेजिंगच्या सुविधेसहित नव्याने सादर केले. हा सकारात्मक बदल लोकांना आणखी आवडला आणि त्यांच्या मोबाइल फोनमधील एसएमएसची जागा ही व्हॉट्सअ‍ॅपने कायमस्वरूपी घेतली. या बदलानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी अडीच लाख वापरकर्ते मिळवले होते आणि यातील प्रत्येकाला व्हॉट्सअ‍ॅप इतके प्रचंड आवडलेले होते की प्रत्येक जण त्याच्या मित्र परिवाराला व्हॉट्सअ‍ॅपची माहिती देऊन ते वापरण्यास सुचवत होता. आज जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटींहून जास्त आहे आणि ही किमया त्यांनी फक्त ५५ कर्मचारी आणि जाहिरातींवर एकही रुपया खर्च न करता केली आहे. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने जनमानसात मिळवलेले स्थान विशेष मानावे लागेल. फेसबुकनंतर इतक्या वेगाने लोकप्रिय होत असलेल्या, लोकांकडून दैनंदिन वापर होत असलेलं आणि आॅनलाइन संवाद क्षेत्रात थेट फेसबुकला आव्हान देत असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे एकमेव स्टार्टअप होतं. यामुळेच एकेकाळी जॅन कोमला आपल्या कंपनीत नोकरी देण्याची संधी नाकारणाऱ्या फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप खरेदी करण्याचा प्रस्ताव जॅनच्या समोर ठेवला. इतकंच नाही तर त्याची कंपनी खरेदी करत त्याला आपल्या कंपनीच्या संचालक मंडळात स्थान दिलं.