शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

पाणीपुरी पार्सल?

By admin | Updated: April 6, 2017 23:55 IST

मी आणि माझी पत्नी पाणीपुरी खाण्यासाठी एका गाडीसमोर उभे होतो.

मी आणि माझी पत्नी पाणीपुरी खाण्यासाठी एका गाडीसमोर उभे होतो. झकपक कपड्यातले एक नवश्रीमंत जोडपे तिथे आले आणि त्यातील पतीने, दो पानीपुरी पार्सल, अशी आॅर्डर दिली. मी उगाचच चक्रावून गेलो. पाणीपुरी रस्त्यावर उभे राहून खायची की घरी नेऊन खायची, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न होता. तितकाच तो त्यांचा खासगी मामलाही होता. हा प्रश्न तात्त्विक चर्चेचा करून त्यावर विचारमंथन घडवून आणण्यात शहाणपणा नाही हे ओळखून मी आमच्या पाणीपुरीची वाट बघू लागलो. रस्त्यावर उभे राहून पाणीपुरीचा आस्वाद घेणे हे तिचा सन्मान करण्यासारखे आहे. तो सन्मान पाणीपुरीचाच नाही, तर जगभर उदयाला आलेल्या मार्गाधिष्ठित खाद्यसंस्कृतीचा आहे. पानीपुरी, मीडियम तिखा, रगडा कम, पानी ज्यादा... अशी रसदार आॅर्डर देऊन तिथल्यातिथे तिचा फडशा पाडत शेवटची सुकी पुरी खाऊन वर त्या कागदी द्रोणातून आणखी पाणी मागून घेऊन एका घोटात संपवणे, हा नव्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा धडा आहे. आपल्या रसनेची मागणी सन्मानाने पूर्ण करणे आणि त्याबरोबरच भय्याच्या त्या तत्पर सेवावृत्तीला सलाम करणे हा तेथील संस्कारांचा भाग आहे. बाजारात फिरताना अनेक गोष्टी आपल्या नजरेस पडतात. खाद्यपदार्थ, भाजीपाला, कपडेलत्ते अशी प्रचंड रेंज असते. आपली पावले एखाद्या ठिकाणी थबकतात, रसना चळते. पण लोक काय म्हणतील, या विचाराचा दबाव मनावर इतका असतो की तो आपल्याला पुढे पुढे ढकलू लागतो. पुढे गेल्यावर किंवा घरी पोहोचल्यावर, अरेरे ती वस्तू घ्यायला हवी होती, असा विचार जर मनात येत असेल तर आपले काहीतरी चुकत आहे हे लक्षात घ्या. नंतर बघू, असे म्हणत तुम्ही जर आनंदाला नेहमी पुढचा दरवाजा दाखवत असाल तर ते तुमच्या आजारपणाचे लक्षण असू शकते. ती सोनचाफ्याची पिवळी धम्मक, सुगंधी फुले घ्यायला हवी होती, पळसाच्या पानावर कापून दिली जाणारी चौकोनी आकारातील हिरवीगार मलईकुल्फी आस्वादायला हवी होती, पाच रुपयांची ती करवंदे त्या म्हातारीकडून घेतली असती तर तिलाही चार पैसे मिळाले असते आणि पाच रुपयांत बालपणीच्या आठवणींचा अमूल्य ठेवा अनुभवता आला असता. छे, चुकलेच आपले... असे म्हणण्याची वेळ वारंवार स्वत:वर येऊ देऊ नका. आनंदाचे छोटे छोटे क्षण पुढे ढकलू नका. तिथेच निर्णय घेऊन त्या क्षणाचा, त्या भावनेचा सन्मान करा. पाणीपुरी घरी नेऊन खाण्यात काय अर्थ आहे? पुढच्या क्षणी आपण असू किंवा नसू हे कुणी पाहिले आहे?-प्रल्हाद जाधव