नेहरू आणि पटेल महान नेते होते. पण या दोघांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देशाचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधले गेले असते, असे मानणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत.
डित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वातंत्र्यलढय़ाचे दोन महानायक आहेत. एक डाव्या विचारसरणीकडे झुकले होते, तर दुसरे उजव्या विचारांकडे कलले होते. पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोघांनी आपल्या विचारधारा बाजूला ठेवल्या, मतभेद विसरले. स्वातंत्र्य मिळवणो हेच दोघांपुढचे उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंच्या विचारांनी देश झपाटला होता. कारण नेहरू हे सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. त्यांचे विचार लोकांना पटायचे. स्वाभाविकपणो पटेलांचे नाव मागे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा भूतकाळ नव्या स्वरूपात पुढे आणला आहे. सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ या रूपात साजरी करून त्यांनी पटेलांचे नाव पुढे आणले
आहे. पण त्यांनी नेहरूंना कमी लेखलेले नाही. आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या अगदी विरुद्ध भूमिका घेताना मोदींनी देश स्वतंत्र करण्यात आणि नंतर तो उभा करण्यात नेहरूंची भूमिका मान्य केली आहे. भाजपाने काढलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात स्वातंत्र्यसेनानी आणि राष्ट्रानिर्मात्यांच्या यादीत नेहरूंना सामील केलेले नाही. पण मोदी नेहरूंचे ऋण विसरायला तयार नाहीत. तसे ते कबूल करतात.
नेहरू आणि पटेल महान नेते होते. पण या दोघांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. नेहरूंच्या जागी सरदार पटेल पंतप्रधान असते तर देशाचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधले गेले असते, असे मानणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत. अर्थात हा सारा जर तरचा खेळ आहे.
तत्कालीन नेत्यांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद हे एकटे या मताचे होते. आझाद हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि नेहरूंचे मार्गदर्शक होते. त्यांनी प्रशासकाच्या रूपात नेहरूंना जवळून पाहिले होते. आझाद आपले सचिव हुमायूं कबीर यांना म्हणाले होते, ‘नेहरूंना राष्ट्रपती आणि सरदार पटेलांना पंतप्रधान बनवायला हवे होते.’ आझाद हे पटेल यांची प्रशंसा करतात . पण ते दोघे विचाराने किंवा दुस:या कुठल्या गोष्टीने एकमेकांच्या जवळ नव्हते. दोघेही राष्ट्रीय लढय़ाचे शिपाई होते. पण दोघांच्या विचारसरणीत टोकाचे अंतर होते आणि ते त्यांनी लपवूनही ठेवले नाही. पटेल हे हिंदुवादी होते. पण अनेकतावादी विचारांवर त्यांचा विश्वास होता. आझाद हे कट्टर धर्मनिरपेक्ष होते. ‘ते हिंदू शो बॉय आहेत’ असा आरोप मुस्लिम लीगने केला होता. आझाद यांनी जोरदारपणो हा आरोप खोडून काढला. त्यांनीे सांगितले की, ‘पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांच्या हिताची नाही, तर नुकसान करणारी ठरेल.’ फाळणीच्या आधी आझाद म्हणायचे, आपली लोकसंख्या कमी असली तरी बरोबरीच्या भावनेने मुसलमान मान वर करून चालू शकतील. धर्माच्या आधारावर एकदा भारताची फाळणी झाली तर ही भावना राहणार नाही. हिंदू मुसलमानांना म्हणतील, ‘तुम्ही तुमचा वाटा घेतला आहे, आता तुम्ही पाकिस्तानात गेले पाहिजे.’
भारताच्या फाळणीचा मामला सरदार पटेलांवर सोपवला असता तर त्यांनी काय केले असते? त्यांनी आधी दोन्ही बाजूच्या लोकांची अदलाबदली केली असती. नंतर फाळणी केली असती. पं. नेहरू वेगळे होते. राजकारण किंवा शासनात धर्माची सरमिसळ त्यांना पसंत नव्हती. दोघांच्या विचारात हा मोठा फरक होता. याच कारणाने महात्मा गांधींनी नेहरूंना
आपला उत्तराधिकारी निवडले. गांधीजींसाठी हिंदू-मुस्लीम ऐक्य हा महत्त्वाचा विषय होता. गांधीजी आणि पटेल हे दोघेही गुजरात राज्यातले. असे असतानाही गांधीजींनी पटेलांऐवजी नेहरूंना
आपला वारस म्हणून निवडले. हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दलचे आपले विचार नेहरूच अधिक जोरदारपणो अमलात आणतील आणि हा मार्ग अहिंसेचा असेल, याची गांधीजींना खात्री होती. याचे एक चांगले उदाहरण त्रवणकोरचे देता येईल. त्रवणकोरच्या महाराजाने आपले राज्य स्वतंत्र असल्याचे घोषित केले आणि भारतापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू केली. या महाराजाला भेटण्यासाठी सरदार पटेल गेले, तेव्हा त्यांनी सोबत खाकी गणवेशातला एक पोलीस घेतला होता. महाराजाने कसलेही नखरे न करता विलीनीकरणावर सही केली. नंतर महाराजाने याचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘मला आणि माङया कुटुंबाला तुरुंगात दिवस काढायचे नव्हते.’
धर्मनिरपेक्ष मूल्यांचे आपले आदर्श नेहरूंच्या हाती सुरक्षित राहतील, असाही गांधीजींना विश्वास होता. पटेल यांनी पाकिस्तानला 64 कोटी रुपये द्यायला नकार दिला, तेव्हा ही बाब सिद्ध झाली. फाळणीच्या करारात ही रक्कम पाकिस्तानला देण्याचे ठरले होते. पण काश्मीरसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना आपण हा पैसा कसा देऊ शकतो, असा पटेल यांचा सवाल होता. पटेल यांना वाकवण्यासाठी शेवटी गांधीजींना उपोषणाला बसावे लागले होते हा इतिहास आहे.
सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. संघाने धर्मनिरपेक्षतेचे वातावरण गढूळ केल्याचे कारण त्यांनी दिले होते. संघावर बंदी घालून त्यांनी योग्यच केले. पण पुढे आपण सांस्कृतिक संघटना असल्याचे संघाने सांगितले तेव्हा पटेलांनी बंदी हटवली. हे खरे नव्हते. देखावा होता. संघाने भाजपाचा उपयोग आपल्या राजकीय हालचालींसाठी केला. सध्या मोदी हा त्यांचा चेहरा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीरपणो सांगून टाकले आहे की, संघ आता राजकारणात भाग घेईल. संघाचा दुटप्पीपणा नेहरूंनी उघड केला होता. पटेल यांचा वापर मोदी आज देश तोडण्यासाठी करीत आहेत, हे दुर्दैव आहे.
कुलदीप नय्यर
ज्येष्ठ स्तंभलेखक