शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

किशोरीताई आमोणकरांचे ‘गानमाहेर’

By admin | Updated: April 5, 2017 05:21 IST

‘शास्त्रीय संगीत ही दैवी शक्ती आहे. त्यातील ‘सा’ कळायलाही आयुष्य जाते.

इंदुमती गणेश,कोल्हापूर- ‘शास्त्रीय संगीत ही दैवी शक्ती आहे. त्यातील ‘सा’ कळायलाही आयुष्य जाते. सुरांना आपल्याशी काहीतरी बोलायचे आहे. आयुष्यभर मी दैवी अस्तित्वाची ही कला जोपासली,’ अशा शब्दांत संगीतपरंपरेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्यासाठी कोल्हापूर म्हणजे त्यांच्या गायकीचे माहेर. किशोरीतार्इंच्या आई मोगूबाई कुर्डीकर या कोल्हापूरचे राजदरबारी गायक उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या शिष्या. मूळच्या कोल्हापूरच्या. जयपूर अत्रौली घराण्याच्या रागदारी गायकीचे सूर पहिल्यांदा त्यांनी कोल्हापूरच्या रंगमंचावर आळविले. कोल्हापूरला ‘कलापूर’ करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उस्ताद अल्लादिया खाँ यांची दरबारी गायक म्हणून नियुक्ती केली होती. किशोरीतार्इंचा जन्म मुंबईचा असला, तरी त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर या उस्ताद अल्लादिया खाँ व हैदर खाँ यांच्या थेट शिष्या. कोल्हापूरच्या उस्ताद अल्लादिया खॉँ यांची जयपूर घराण्याची मूळ गायकी असल्याने, किशोरीताई या शहराला आपले ‘गानमाहेर’ मानायच्या. मोगूबार्इंच्या कडक शिस्तीत शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या किशोरीताई आईच्या मागे बसून गाणे शिकल्या. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडेही त्यांनी बंदिशीचे धडे घेतले. खर्डेकर बोळात बापूसाहेब करमरकर यांच्याकडे त्या बऱ्याचदा मुक्कामाला असायच्या. शतकोत्तर रौप्यमहोत्सव पार केलेल्या गायन समाज देवल क्लबमध्ये त्यांनी बालपणापासून अनेक मैफली गाजविल्या. ‘नाव व पैसा मिळणारे संगीत गाऊ नकोस,’ ही आईने दिलेली शिकवण पाळत, त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैश्विक विचार केला. ‘माझे माहेर असलेल्या कोल्हापूरच्या उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या संगीत परंपरेचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत त्या कोल्हापूरबद्दलचे प्रेम व्यक्त करत. कोल्हापूरची गानपरंपरा आणि गायन समाज देवल क्लबशी किशोरीतार्इंचा वर्षानुवर्षांचा ऋणानुबंध. गतवर्षी म्हणजेच २ जानेवारी २०१६ मध्ये देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. हा त्यांचा अखेरचा दौरा ठरला. छत्रपती शाहू साखर कारखाना, देवल क्लब आणि व्हायोलिन अकादमी, पुणे यांच्या वतीने २०१२ साली आयोजित उस्ताद अल्लादिया खाँ संगीत महोत्सवात, किशोरीतार्इंना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आम्ही आयुष्यभर सुरांची आराधना केली. सुरांच्या इच्छेनुसार आम्ही गायलो. शास्त्रीय संगीत म्हणजे नोटेशन नव्हे. सूर आपल्या हृदयात यावे लागतात. मग हृदय सुरांकडे येते, तेव्हा शास्त्रीय संगीत तयार होते. आज मात्र, संगीताची उपासनाच होत नाही. प्रेक्षकांची अभिरुची ओळखून सुरांना गुलाम केले जाते. त्यामुळे सूर आणि साधकांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचा धागाच राहिलेला नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.>कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी, २ जानेवारी २०१६ रोजी उपस्थित असलेल्या किशोरीताई आमोणकर यांना अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते.