शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

अजूनही आभाळाकडे डोळे

By admin | Updated: August 10, 2016 04:09 IST

पाऊस आला आणि सारे कसे सुजल सुफल झाले, असेच महाराष्ट्राचे वर्णन केले जात असले तरी मराठवाडा अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे़

पाऊस आला आणि सारे कसे सुजल सुफल झाले, असेच महाराष्ट्राचे वर्णन केले जात असले तरी मराठवाडा अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे़ वरूणराजा शेतीपुरता बरसला आणि बळीराजा काही अंशी समाधानी झाला तरी पेयजलाचे संकट अजूनही घोंघावते आहे़ मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा २५ टक्क्यांवर नाही़ बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा प्रकल्प तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सिना-कोळेगावमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे़ हिंगोली जिल्ह्यातील दोन-चार गावांपुरती झालेली अतिवृष्टी, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनीची अतिवृष्टी आणि पिके तगून जातील इतका पाऊस पाहून तुलनेने आनंदी वातावरण आहे़ गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील प्रत्यक्ष पावसाळा १८ ते २८ दिवस इतकाच असतो़ एक-दोन दिवसच धो-धो बरसतो़, सरासरी ओलांडतो, नदी-नाल्यांनी वाहून जातो़ अखेरीस टंचाईच्या झळा कायम ठेवून जातो़ मराठवाड्यात जलसंधारणाची कामे कमी़ मोठे जलसाठे गाळयुक्त तर लघु प्रकल्पांना झाडाझुडुपांनी खाऊन टाकलेले़ राळेगणसिद्धी, हिवरेबाजारची उदाहरणे देण्यापलीकडे काम होत नाही़ मराठवाड्याला चिकटून असलेल्या तेलंगणात बासरजवळ गोदावरीतून मोठा कालवा काढून शेजारच्या तलावात पाणी साठवण्याची सोय केली आहे़ आम्ही मात्र पूर रेषेतील गावांना इशारे देण्यापलीकडे काहीही केले नाही़ अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने नांदेडचे विष्णूपुरी भरले़, परंतु शेजारील तलाव तळाशी आहेत़ प्रत्यक्षात विष्णूपुरीचे दरवाजे उघडण्यापूर्वी तेथील पाणी जवळच्या तलावांमध्ये उचलण्याची कुठलेही नियोजन नाही़ राज्यात नव्हे, देशात चर्चिला गेलेला लातूरचा पाणीप्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त होत असला तरी तो आनंद दीर्घकाळ टिकण्यासाठी बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प भरणे आवश्यक आहे़ पूर आला म्हणून जायकवाडी ३३ टक्क्यांवर पोहोचले़ त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या पूर्णा-येलदरीत आठ टक्के जलसाठा आहे़ सिद्धेश्वर, निम्न तेरणा, मनार प्रकल्पांची स्थिती वेगळी नाही़ त्यामुळे जिल्ह्याची ठिकाणे असलेल्या लातूर, परभणी, जालना, बीड शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न नजीकच्या काळातच पुन्हा उभा राहणार आहे़ ग्रामीण भागात जलयुक्त शिवारने दिलेला अंशत: दिलासा दिसत असला तरी मराठवाड्याचा प्रश्न दीर्घकालीन मोठ्या योजनांशिवाय सुटणार नाही़ पावसाळ्यात का होईना वाहणाऱ्या नदीपात्राच्या परिसरात असलेल्या तलावांमध्ये पाणी उचलण्याची सोय करावी लागणार आहे़ सरकारी काम सहा महिने थांब़़़गेल्या वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला़ ज्याद्वारे १८०० मिलिमीटर पाऊस पाडला, असा दावा राज्य सरकारने केला़ तो कोठे आणि कधी पाडला, हा प्रश्न असला तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात़ या वर्षी मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणाऱ १२३ टक्के पाऊस होणाऱ, १०६ टक्के पाऊस होणार, असे वेधशाळेचे अंदाज प्रसिद्ध होत राहिले़ परिणामी सरकारनेही कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर टाकला़ मराठवाड्यात शून्य टक्के उपयुक्त साठा असलेल्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, अशी मागणी झाली़ सरकारने मात्र राज्यभर होत असलेल्या कोसळधारांकडे बोट दाखवत प्रयोगाला पूर्णविराम दिला़ याउलट प्रयोग झाला असता व तो यशस्वी केला गेला असता तर पेयजलाचे नियोजन दीर्घकाळ टिकले असते़ शेवटी पावसाच्या कृत्रिम प्रयोगासाठीही सरकारी काम सहा महिने थांब असेच झाले़ - धर्मराज हल्लाळे