शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

श्रीलंकेचे भारतविरोधी डावपेच

By admin | Updated: November 10, 2014 01:54 IST

रत आणि श्रीलंका यांच्यातील सागरीक्षेत्रातून अमली पदार्थांची चोरटी आयात करणाऱ्या पाच भारतीय मासेमाऱ्यांना श्रीलंका सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बलबीर पूंज(भाजपचे उपाध्यक्ष )रत आणि श्रीलंका यांच्यातील सागरीक्षेत्रातून अमली पदार्थांची चोरटी आयात करणाऱ्या पाच भारतीय मासेमाऱ्यांना श्रीलंका सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत या घटनेकडे शुद्ध न्यायालयीन प्रक्रिया म्हणून पाहिले गेले असते. पण, श्रीलंकेच्या संदर्भात सर्वसाधारण हे काहीच नसते. श्रीलंकेच्या लष्कराने तमीळ वाघांची बंडखोरी कठोर हाताने मोडून काढली. त्यामुळे त्या राष्ट्रातील अल्पसंख्य तमीळ जनतेच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या पाठिंब्याने श्रीलंकेतील तमीळ जनतेच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा ठराव मंजूर झाला होता. तमीळ जनतेच्या विरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आल्यानंतर श्रीलंकेत लष्कराचे महत्त्व वाढले होते. ते कमी करण्यासाठी श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी लष्करप्रमुख फोन्सिका यांना एका घोटाळ्यात गुंतवून हा काटा अलगदपणे सत्तासंघर्षातून बाहेर काढला. तमीळ वाघांचा प्रतिकार श्रीलंकेच्या लष्कराने मोडून काढल्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये फोन्सिका यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांना निवडणुकीच्या माध्यमातून आव्हान देण्याचा विचार केला होता. त्यांचा काटा काढल्यानंतर जी वृत्तपत्रे अध्यक्षांवर टीका करीत होती त्यांच्यावर सरकारने बंदी आणली. तसेच, अनेक पत्रकारांना तुरुंगात टाकले. श्रीलंकेतील तमीळबहुल क्षेत्रात स्वायत्तता देण्याचे अध्यक्ष राजपक्षे यांनी भारताशी झालेल्या चर्चेत मान्य केले होते. पण अशी स्वायत्तता देण्याला त्या देशातील अतिरेकी बौद्धांचा विरोध आहे. तमीळ वाघांवर मिळालेल्या विजयानंतर झालेल्या निवडणुकीत सत्ता हाती आल्यावर अध्यक्ष राजपक्षे यांना सत्तेचा मद चढलेला दिसतो. अशा स्थितीत पाच मासेमाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याकडे भारत सरकार संशयाने पाहत आहे. श्रीलंका सरकारची कृती त्यांच्या देशातील लोकांना खूश करणारी आहे. वास्तविक श्रीलंकेच्या घटनेनुसार देशातील सिंहली आणि तमिळी जनतेला समान दर्जा देण्यात आला आहे. सरकारचे कामकाज या दोन्ही भाषेत चालावे, असेही घटनेत नमूद केले आहे. पण सध्या श्रीलंकेत तमीळविरोधी भावना प्रबळ झाली असून, त्यामुळे तमीळ जनतेला विशेषत: जाफना भागात स्वायत्तत्ता देण्याच्या दृष्टीने करण्यात येणारी घटनादुरुस्ती राजपक्षे पुढे ढकलत आहेत. तमीळ जनतेचा एलटीटीई या नावाने ओळखला जाणारा दहशतवादी गट आपल्या हिंसक प्रवृत्तीेमुळे तमीळ जनतेला श्रीलंकेच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे पाडीत आहेत. त्यामुळे सिंहली जनता तमीळ जनतेपासून अंतर राखीत आहे. तमिळनाडूतील द्रविड पक्ष हे श्रीलंकेतील तमीळ अतिरेक्यांना पाठीशी आहेत. या अतिरेकी भूमिकेमुळे तेथील तमीळ जनतेवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते. अनेक दशकांपासून परस्परांच्या हत्या करण्यात आल्यामुळे या दोन भाषकांतील सौहार्दाचे वातावरण संपुष्टात आले आहे. या दोन गटांना एकत्र आणून त्यांच्यातील सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात नाहीत. श्रीलंकेविरुद्ध भारताने कठोर भूमिका घ्यावी, अशी तमिळनाडूतील जनतेची मागणी आहे. पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगाने श्रीलंकेतील मानवी हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचा ठराव संमत केला, त्या वेळी भारताने अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकत नव्या सरकारच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांना निमंत्रित केले होते. या निमंत्रणातून कोलंबोला वगळण्यात यावे, अशी मागणी तमिळनाडूतील पक्षांनी केली होती. पण, मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या तऱ्हेने भारताकडून चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला जात असताना श्रीलंकेचे सरकार मात्र वेगवेगळ्या मार्गाने भारताला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनला भारताच्या विरुद्ध उभे केल्याने कोलंबोवर दबाव आणण्याचे प्रयत्न भारताकडून केले जाणार नाहीत, असे राजपक्षे सरकारला वाटते. तसे केल्याने तमिळींना स्वायत्तता देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असे तेथील सरकारला वाटते. २००९ साली श्रीलंकेच्या उत्तर भागातील तमीळ जनतेचा उठाव लष्कराकडून दडपून टाकला जात असताना संपुआ सरकारने कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका स्वीकारली होती. हिंदी महासागरात भारताच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संपुआ सरकारने श्रीलंकेच्या सरकारने चालवलेल्या हत्याकांडाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एलटीटीईनेदेखील भारतीय जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट राजीव गांधींची हत्या केली. त्या घटनेनंतर एलटीटीईने भारताची सहानुभूती गमावली. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारांनी श्रीलंकेत सुरू असलेल्या तमीळ बंडखोरांच्या विरुद्ध तेथील सरकारने केलेल्या कारवाईकडे दुर्लक्ष केले. हिंदी महासागरात पाय रोवण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. बीजिंगने या भागात नौदल आणून स्वत:चे अस्तित्व दाखवले आहे. श्रीलंकेसोबत नौदलाच्या कवायती करण्याच्या नावाखाली चीनने या भागात प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. अशा स्थितीत श्रीलंकेशी चांगले संबंध ठेवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. अलीकडे श्रीलंकेतील बंदरांमध्ये चीनच्या जहाजांना इंधन भरण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच जहाजावरील कर्मचाऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींकडे भारताला दुर्लक्ष करता येणार नाही. या भागातील अंदमान व निकोबार बेटे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या बेटांवर चीनचा डोळा असून, श्रीलंकेपासून ही बेटे अधिक जवळ आहेत. दुसरीकडे पाकिस्तानातील ग्वादार या बंदराचा विकास करण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. अशा तऱ्हेने एकीकडे अरबी समुद्रात, तर दुसरीकडे हिंदी महासागरात पाय रोवण्याची चीनने सिद्धता केली आहे. अध्यक्ष राजपक्षे यांनी आपल्या देशातील काही प्रकल्पांच्या उभारणीसाठी भारताचे प्रस्ताव डावलून चीनला जवळ केले आहे. अशा तऱ्हेने चीनला भारताविरुद्ध झुंजवण्याचा प्रयत्न राजपक्षे सरकार करीत आहे. या सर्व घटनांमधून योग्य तो बोध घेऊन भारताने आपल्या नौदलाची क्षमता वाढवली पाहिजे आणि ते अधिक मजबूत केले पाहिजे. सागरी क्षेत्रात भारताला स्वत:चा प्रभाव निर्माण करणे गरजेचे झाले आहे.