शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबा

By admin | Updated: May 12, 2015 06:55 IST

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा

गजानन जानभोर -

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा येथे शंकरबाबांचे दीडेकशे अपंग, अनाथांचे शापित कुटुंब राहते. या आश्रमात शंभरेक अंध-अपंग, मतिमंद, मूकबधिर मुले-मुली आहेत. संडासात, नालीत किंंवा कचरापेटीत फेकून दिलेल्या या अनाथ मुलांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा गरीब कार्यकर्ता मांडून बसला आहे. परवा यातील कांती या मुलीचे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात लग्न झाले. वीस वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यात ती सापडली. शंकरबाबांनी तिला आश्रमात आणले, मोठे केले, शिकवले आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचे कर्तव्य पूर्ण केले. या फकीराच्या घरातील हे सोळावे लग्न.आपल्या घरात एखादे मतिमंद वा अपंग मूल असेल तर आपण मनाने कायमचे खचलेले असतो. ‘नशिबाचे भोग’ म्हणून त्या निष्पाप जिवाकडे दुर्लक्ष करीत त्याच्या जगण्याचे हक्क नकळत हिरावूनही घेतो. शंकरबाबा मात्र नाव, गाव, जात, धर्म यापैकी काहीच ठाऊक नसलेल्या या मुलांच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच कचरापेटीत सापडलेल्या ज्योतीला एक दिवस कलेक्टर बनविण्याचे स्वप्न ते पाहतात. ‘रोजी’ या ख्रिश्चन मुलीला ते जसे जन्मदाता वाटतात, त्याच वेळी ‘मुन्नी’ ही मुस्लीम मुलगी त्यांच्यात रक्ताचे नाते शोधण्याचा प्रयत्न करीत असते. रामचंद्र आणि रहेमानला जीव लावताना बाबांची जात आणि धर्म कायमचा गळून पडतो.शैलजा या मूकबधिर मुलीची गोष्ट अशीच. आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडाऱ्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आणले. ‘कु. शैलजा शंकर पापळकर’ हे नाव दिले. मूकबधिर विद्यालयात ती शिकली. त्याच विद्यालयात शैलजा नोकरीला आहे. तिला पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी तिच्या अभिनंदनासाठी एक खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. तिचे लग्नही लावून दिले. शंकरबाबांच्या आणखी एका मुलीचे, बालीचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. तिच्या साक्षगंधाच्या दिवशी शंकरबाबांची पत्नी पंचफुलाबार्इंचे निधन झाले. सर्वजण काही क्षणासाठी सुन्न झाले, त्यांचे सांत्वन करू लागले, बाबा मात्र अविचल. एक क्षण असा आला की, त्यांनाच इतरांचे सांत्वन करावे लागले. आपली पत्नी आता या जगात नाही, ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच समजली होती. पण ती सर्वांपासून लपवून ठेवली. मुलीला आयुष्याचा साथीदार मिळवून दिल्याचा आनंद एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात पत्नी कायमची साथ सोडून गेल्याचे दु:ख घेऊन हा माणूस सर्वांसोबत अगदी सहज वावरत होता. सामान्य माणसासारखे त्यांनाही दु:ख झाले असेल, पत्नीसोबत घालवलेल्या संसारातील आठवणींनी तेही व्याकुळ झाले असतील. नात्यांचे कोवळे बंध त्यांनाही अस्वस्थ करीत असतील. पण मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना हा माणूस सर्वांनाच फसवून दिवसभर आतून रडत होता. अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नाही तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. त्यासाठीच त्यांची दिवस-रात्र धडपड सुरू असते. ‘१८ वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा’, ही त्यांची तगमग त्याच धडपडीचा एक भाग आहे. आई-वडिलांनी टाकून दिलेल्या देशातील लाखो मतिमंद मुलांच्या भविष्याची चिंंता त्यांना भेडसावीत असते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही. देशात दरवर्षी अशी एक लाख मुले अनाथाश्रमाबाहेर पडतात. ती मग कुठे जातात? सरकारही आपली संवेदना हरवून बसले आहे, हा शंकरबाबांचा सात्त्विक संताप आहे. आपण गेल्यानंतर या मुलांचे कसे होईल, या प्रश्नाने ते अलीकडे व्याकुळ होतात. परवा सासरी निघालेल्या कांतीला आशीर्वाद देताना चेहऱ्यावरील ही अस्वस्थता त्यांना पहिल्यांदाच लपवता आली नाही.