निकलस जॉनसन, होल्गर सेम, सेबॅस्टिन क्लायन, टबायस बालींग हे चार शाळकरी मित्र. शाळेत विविध विषयांचा अभ्यास करताना ते त्यांनी काढलेल्या नोट्स, पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे हे परीक्षेच्या आधी एकमेकांना अभ्यासासाठी देत असत. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यासातील भरपूर वेळही वाचत असे आणि कमी वेळात त्यांचा जास्त अभ्यास होत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे मित्र आपापल्या व्यावसायिक आयुष्यात व्यग्र झाले. विद्यार्थी ते नोकरी या प्रवासात या मित्रांचं पुस्तकप्रेम हे अबाधित होतं. मात्र दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असल्याने अनेक चांगली पुस्तकं ही विकत घेतल्यानंतरही तशीच, न वाचता एका कोपऱ्यात पडून राहत होती. पुस्तकं वाचायला वेळच मिळत नव्हता. २०१२ साली पुन्हा ही सगळी मंडळी या विषयवार चर्चा करताना पुस्तकं वाचनाची आपल्याला असणारी ही वेळेची समस्या आपल्याप्रमाणेच अनेकांना असणार आणि त्याचं समाधान अद्याप उपलब्ध नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यातूनच पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे आणि सारांश मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या ब्लिंकिस्ट या स्टार्ट अपचा जन्म झाला. हे चारही मित्र जर्मनीमधील असल्याने त्यांनी सुरुवातील जर्मन भाषेत ही सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या व्यावसायिक संकल्पनेला व्यापक स्वरूपात यशस्वी करायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नसल्याने त्यांनी नंतर पूर्ण लक्ष हे इंग्रजी भाषेवर केंद्रित केलं. काल्पनिक अर्थात फिक्शन पुस्तकांपेक्षा थेट एखाद्या विशिष्ट विषयासंदर्भातील पुस्तकं ज्यातून आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकता येईल अशा नॉन फिक्शन पुस्तकांची त्यांनी एक यादी तयार केली. ती पुस्तकं काळजीपूर्वक वाचून त्यातून कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे कोणते, महत्त्वाचे संदर्भ कोणते हे सगळं सारांशच्या माध्यमातून आपल्या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये त्यांनी समाविष्ट केलं. अशा प्रकारे प्रत्येक पुस्तकाचा सारांश हा जास्तीतजास्त १५ मिनिटांत वाचून होईल याची त्यांनी काळजी घेतली. अर्थात अशा प्रकारे एखाद्या पुस्तकाचा सारांश तयार करणे हे काम भरपूर वेळ घेत असे. याशिवाय संबंधित पुस्तक वाचून त्याचा सारांश तयार करणाऱ्या व्यक्तीला त्या पुस्तकाच्या विषयाची माहिती असणे हेसुद्धा आवश्यक होते. त्यामुळे सुरुवातीला दर महिन्याला ब्लिंकिस्टवर जास्तीतजास्त पाच ते सहा नवीन पुस्तकांचे सारांश उपलब्ध होत असत. त्यामुळे पुस्तकांची संख्या वाढविण्यासाठी ब्लिंकिस्टने बुक रीडर्स अर्थात पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तींना फ्रीलान्स स्वरूपात काम देण्यास सुरुवात केली. यामुळे एकाचवेळी अनेक पुस्तकांचे सारांश जलदरीत्या तयार करण्यास मदत झाली. यामुळे ब्लिंकिस्टवर दर महिन्याला ४० गाजलेल्या नॉन फिक्शन पुस्तकांचे अनुवाद उपलब्ध होऊ लागले. फक्त १५ मिनिटांत गाजलेली पुस्तके अख्खी वाचता येत असल्याने हाडाच्या पुस्तकप्रेमींमध्ये ब्लिंकिस्ट लोकप्रिय होत होते. विशेषकरून यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती आणि पत्रकारांचासुद्धा समावेश होता. त्यामुळे या दिग्गज मंडळीच्या विश्वात ब्लिंकिस्टचा वेगाने प्रचार होऊ लागला आणि ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मासिकानेसुद्धा त्याची दखल घेतली. वाचकांच्या आवडी-निवडीकडे, त्यांच्या सूचनांकडे ब्लिंकिस्टने काळजीपूर्वक लक्ष दिले; आणि अनेक नवीन फिचर्स वाचकांना उपलब्ध करून दिले. आज ब्लिंकिस्टवर पुस्तकांचे सारांश हे ऐकतासुद्धा येतात, त्यामुळे प्रवास करता-करतासुद्धा वेळ वाया न घालवता पुस्तके वाचणे, त्यातून शिकणे वाचकांना शक्य झाले आहे. आज ब्लिंकिस्टवर १४००हून जास्त पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. जगभरात १४०हून अधिक देशांत चार लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी ब्लिंकिस्टचा पुस्तके वाचण्यासाठी वापर करीत आहेत. >कलस जॉनसन, होल्गर सेम, सेबॅस्टिन क्लायन, टबायस बालींग हे चार शाळकरी मित्र. शाळेत विविध विषयांचा अभ्यास करताना ते त्यांनी काढलेल्या नोट्स, पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे हे परीक्षेच्या आधी एकमेकांना अभ्यासासाठी देत असत. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यासातील भरपूर वेळही वाचत असे आणि कमी वेळात त्यांचा जास्त अभ्यास होत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे मित्र आपापल्या व्यावसायिक आयुष्यात व्यग्र झाले. विद्यार्थी ते नोकरी या प्रवासात या मित्रांचं पुस्तकप्रेम हे अबाधित होतं. मात्र दैनंदिन कामांमध्ये व्यग्र असल्याने अनेक चांगली पुस्तकं ही विकत घेतल्यानंतरही तशीच, न वाचता एका कोपऱ्यात पडून राहत होती. पुस्तकं वाचायला वेळच मिळत नव्हता. २०१२ साली पुन्हा ही सगळी मंडळी या विषयवार चर्चा करताना पुस्तकं वाचनाची आपल्याला असणारी ही वेळेची समस्या आपल्याप्रमाणेच अनेकांना असणार आणि त्याचं समाधान अद्याप उपलब्ध नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यातूनच पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे आणि सारांश मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या ब्लिंकिस्ट या स्टार्ट अपचा जन्म झाला. हे चारही मित्र जर्मनीमधील असल्याने त्यांनी सुरुवातील जर्मन भाषेत ही सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या व्यावसायिक संकल्पनेला व्यापक स्वरूपात यशस्वी करायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नसल्याने त्यांनी नंतर पूर्ण लक्ष हे इंग्रजी भाषेवर केंद्रित केलं. काल्पनिक अर्थात फिक्शन पुस्तकांपेक्षा थेट एखाद्या विशिष्ट विषयासंदर्भातील पुस्तकं ज्यातून आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकता येईल अशा नॉन फिक्शन पुस्तकांची त्यांनी एक यादी तयार केली. ती पुस्तकं काळजीपूर्वक वाचून त्यातून कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे कोणते, महत्त्वाचे संदर्भ कोणते हे सगळं सारांशच्या माध्यमातून आपल्या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये त्यांनी समाविष्ट केलं. अशा प्रकारे प्रत्येक पुस्तकाचा सारांश हा जास्तीतजास्त १५ मिनिटांत वाचून होईल याची त्यांनी काळजी घेतली. अर्थात अशा प्रकारे एखाद्या पुस्तकाचा सारांश तयार करणे हे काम भरपूर वेळ घेत असे. याशिवाय संबंधित पुस्तक वाचून त्याचा सारांश तयार करणाऱ्या व्यक्तीला त्या पुस्तकाच्या विषयाची माहिती असणे हेसुद्धा आवश्यक होते. त्यामुळे सुरुवातीला दर महिन्याला ब्लिंकिस्टवर जास्तीतजास्त पाच ते सहा नवीन पुस्तकांचे सारांश उपलब्ध होत असत. त्यामुळे पुस्तकांची संख्या वाढविण्यासाठी ब्लिंकिस्टने बुक रीडर्स अर्थात पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तींना फ्रीलान्स स्वरूपात काम देण्यास सुरुवात केली. यामुळे एकाचवेळी अनेक पुस्तकांचे सारांश जलदरीत्या तयार करण्यास मदत झाली. यामुळे ब्लिंकिस्टवर दर महिन्याला ४० गाजलेल्या नॉन फिक्शन पुस्तकांचे अनुवाद उपलब्ध होऊ लागले. फक्त १५ मिनिटांत गाजलेली पुस्तके अख्खी वाचता येत असल्याने हाडाच्या पुस्तकप्रेमींमध्ये ब्लिंकिस्ट लोकप्रिय होत होते. विशेषकरून यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती आणि पत्रकारांचासुद्धा समावेश होता. त्यामुळे या दिग्गज मंडळीच्या विश्वात ब्लिंकिस्टचा वेगाने प्रचार होऊ लागला आणि ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मासिकानेसुद्धा त्याची दखल घेतली. वाचकांच्या आवडी-निवडीकडे, त्यांच्या सूचनांकडे ब्लिंकिस्टने काळजीपूर्वक लक्ष दिले; आणि अनेक नवीन फिचर्स वाचकांना उपलब्ध करून दिले. आज ब्लिंकिस्टवर पुस्तकांचे सारांश हे ऐकतासुद्धा येतात, त्यामुळे प्रवास करता-करतासुद्धा वेळ वाया न घालवता पुस्तके वाचणे, त्यातून शिकणे वाचकांना शक्य झाले आहे. आज ब्लिंकिस्टवर १४००हून जास्त पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. जगभरात १४०हून अधिक देशांत चार लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी ब्लिंकिस्टचा पुस्तके वाचण्यासाठी वापर करीत आहेत. - कुणाल गडहिरे
वाचनीय स्टार्ट अप : ब्लिंकिस्ट
By admin | Updated: July 31, 2016 06:49 IST