शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

नांगरणी

By admin | Updated: May 30, 2016 03:04 IST

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे.

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एक कथा या संदर्भात विलक्षण बोलकी ठरते. पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू असताना बुद्ध एका शेताच्या मेरेवरून चालले होते. रानात शेतकऱ्याने औत धरले होते. मन लावून शेतकरी औत हाकत होता. मात्र औताचा तास तिरकाच पडत राहिल्याचे बुद्धांच्या ध्यानात आले. ‘‘अरे, तुझा तास सरळ नाही तर तिरका आहे,’’ असे बुद्धांनी टोकताच, नाही म्हटले तरी शेतकरी वरमलाच. ‘‘अहो संन्यासीबाबा, औत हाकण्यातले आपल्याला काय कळते? आपण काय शेतकरी आहात का?’’ शेतकऱ्याने भगवान बुद्धांना अंमळ त्रासूनच प्रश्न केला. मुखावरची शांती आणि हासू कणभरही ढळू न देता बुद्ध उत्तरले, ‘‘होय, मीसुद्धा तुझ्यासारखा एक शेतकरीच आहे.’’ आता अचंबित होण्याची पाळी होती शेतकऱ्याची! ‘‘महाराज आपण कधी शेती केलीत? कोठे आहे तुमचे शेत?’’ तो शेतकरी विचारता झाला. बुद्ध हसले. म्हणाले, ‘‘अरे, हे माझे शरीर दिसते आहे ना तेच माझे शेत. यातील मन हेच माझे वावर. त्याची नांगरणी करण्यासाठी विवेकाचा नांगर मी त्यांत घालतो. अनिष्ट विचार आणि कुवासनांची धसकटे वेचून काढतो. वैराग्यरूपी अग्नीने राब जाळतो. सद्विचारांचे बीज पेरतो. निर्मळ प्रज्ञेचे सिंचन पुरवतो आणि त्या माझ्या वावरातून निर्वाणाचे अमूप पीक मी पदरात पाडून घेतो.’’ एवढं उत्तर देऊन भगवान आपल्या वाटेने शांतपणे निघून गेले! समाजरूपी शेताची निगराणी संतविचार याच भूमिकेतून करत आलेले आहे. विवेकाचा आग्रह ही परंपरा प्रकर्षाने धरते त्याचसाठी. विवेकाच्या नांगराने आपण आपल्या मनाची भूमी सतत नांगरायची असते. या नांगरणीमध्ये खंड पडता कामा नये. परंतु, विवेकाचा नांगर हाती पेलून मनरूपी शेताची नांगरट अविरत चालू ठेवणे, हे विलक्षण धैर्याचे काम होय. कारण, विवेकाच्या आधारे जीवनाची वाटचाल सुरू राखणे, हे असिधारा व्रतच जणू! म्हणूनच की काय, पण, ‘देह’गाव वसवण्याचे कौलपत्र सुपूर्त केलेल्या ‘जिवा’जीपंत ठाणेदाराला ‘आत्मा’रामपंत कमाविसदार एक मोठा सावधगिरीचा इशारा देऊन ठेवतात. एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला समाजमनस्क संत या ठिकाणी आपल्याला अतिशय ठसठशीतपणे प्रतीत होतो. ‘आत्मा’रामपंत ‘जिवा’जीपंतांना बजावतात, ‘‘धैर्याचा नांगर धरून। शेतांमधील खडे काढून। वासनेच्या पालव्या तोडून। संशयाच्या काशा गोळा करून।’’ गावची लावणी करणे. संतपरंपरेने आपल्याला परोपरीने केलेल्या या बोधाचाच नेमका विसर आज पडतो आहे का? विवेकाचा नांगर आपण गुंडाळून अडगळीत फेकून दिलेला आहे का? मनरूपी शेताची मशागत जागृतीने करण्यासाठी ‘विवेकाचा नांगर धरा’ या आवाहनाचा विचार आपण केव्हा करणार? या नांगरणीला आपण अजून किती उशीर लावणार?-अभय टिळक