शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकारांच्या टोपणनावानिमित्त...

By admin | Updated: June 12, 2016 05:33 IST

चित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ!

- रविप्रकाश कुलकर्णीचित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ!दलाल १९३८ च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या 'वैमानिक हल्ला' या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली. (जाता-जाता - ज्याला मुखपृष्ठ म्हणता येईल, असे पहिले मुखपृष्ठ कुणाचे असेल? वि. स. सुखटणकर यांच्या 'सह्याद्रीच्या पायथ्याशी'चे मुखपृष्ठ असे होते, असे म्हणतात. आपल्याकडे चित्रसाक्षरता आता कुठे रूजू लागली आहे. हे खरेच, पण त्याच्याबरोबर असेही म्हणता येईल की, साहित्यातदेखील चित्रकलेइतकी रुची असणारा रविमुकुल हा कलाकार असल्यामुळे त्याच्या चित्रकारीचा उचित सन्मान केला गेला असावा. या अनुषंगाने बोलणे होत असताना मुद्दा असाही आला की, रविमुकुल हे टोपणनाव. टोपननाव घेऊन चित्र काढणारा हा एकमेव चित्रकार असावा. (जाता-जाता या चित्रकाराचे खरे कागदोपत्री नाव विश्वास मुकुंद कुलकर्णी. मग त्यांनी रविमुकुल हे नाव का घेतले? त्याचा खुलासा त्यांच्याच शब्दात. ‘र’ हे अक्षर त्यांच्या रमेशमामावरून घेतले. कारण विश्वासने चित्रकलेची प्रेरणा या मामांकडून घेतली. हे मामा अकाली गेले, म्हणून त्यांच्या वंश म्हणून ‘र’ आला. वि. हे अक्षर माझा विश्वास नावातले. ‘मु’ म्हणजे माझ्या वडिलांच्या मुकुंद नावातले आणि कुल हा कुलकर्णीचा शॉर्टफॉर्म. अर्थात, याचाच पडसाद म्हणून की काय माहीत नाही, पण सो. कुल (सोनाली कुलकर्णी), रघुकुल (रघुवीर कुलकर्णी असे कुल शोधता येतील..), तर टोपणनाव असणारा रविमुकुल हा एकमेव चित्रकार असावा. तेव्हा चित्रकार रविमुुकुल म्हणाले, ‘टोपणनाव घेतलेला मी पहिला चित्रकार नक्कीच नाही. दीनानाथ दलाल हे नाव पण टोपणनाव आहे!’अर्थात, ही माहिती सर्वस्वी नवीनच. दलालांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भरभरून लिहून झाले, अजूनही लिहून येईल. (जन्म ३0 मे १९१६, मृत्यू १५ जानेवारी १९७१), पण त्या लेखनात सर्वत्र दीनानाथ दलाल अशीच नोंद दिसते.त्यामुळे रविमुकुल यांना म्हटले, या गोष्टीची खातरजमा कशी, कुठे करायची?तेव्हा ते म्हणाले, ‘विवेक’तर्फे दृष्यकला खंड प्रकाशित झालेला आहे. त्यात ही नोंद पाहा आणि खातरजमा करून घ्या!‘विवेक’चा दृष्यकला खंड (केव्हाच) आउट आॅफ प्रिन्ट झालेला आहे, हेदेखील आश्चर्यच. त्यामुळे आता हा खंड चटकन कुणाकडे उपलब्ध होईल हा प्रश्न पडला, पण सुदैवाने डोंबिवली पश्चिम येथे असलेल्या डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाने हा खंड उपलब्ध करून दिला. (हे ग्रंथालय पोलीस स्टेशनच्या वर आहे, हे पण त्याचे वेगळेपण...)या कोषात नोंद आहे, जनसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत लोकप्रिय असलेले आणि पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रे, व्यंगचित्रे, दिनदर्शिका आणि दिवाळी अंकामधील चित्रमालिकांच्या माध्यमातून दृष्यजाणिवा समृद्ध करणारे चित्रकार म्हणून दीनानाथ दलाल सर्वांना परिचित आहेत.दीनानाथ यांचा जन्म निसर्गसौंदर्याने संपन्न आणि कलासौंदर्याने नटलेल्या गोव्याच्या मडगावातील कोम्ब या पाड्यात झाला. नृसिंह दामोदर दलाल नाईक हे त्यांचे मूळ नाव. ‘दीनानाथ दलाल’ या टोपननावाने त्यांनी पुढे व्यवसाय केला (पृष्ठ २0९)डॉ. स्वाती राजवाडे, शकुंतला फडणीस यांनी दृष्यकला खंडातील केलेल्या या नोंदीत काही माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ, त्या नोंदीत म्हटले आहे, या निमित्ताने दीनानाथ दलालांसंबंधात विशेषत: त्यांच्या चित्रावरील स्वाक्षरीसंबंधी थोडेसे- दीनानाथ यांच्या सुरुवातीच्या मुखपृष्ठ, चित्रांवर दलाल ही अक्षरे रोमन लिपीत दिसतात. विशेषत: डी हा त्रिकोणासारखा असतो, जो त्रिकोण पुढे (अर्थात फिरवून) मराठी-देवनागरी ‘द’ च्या भोवताली आला. काही काळ चित्रांवर दलाल ही प्रवाही अक्षरे म्हणून दिसतात. त्यानंतर, काही काळ चित्रात कोपऱ्यात त्रिकोणात ‘फ’चा रंगीत ‘द’ स्वाक्षरी म्हणून दिसतो आणि नंतरच्या बहुतेक चित्रात लाल-निळ्या पोकळ वा भरीव त्रिकोणात ‘द’ हे अक्षर ही स्वाक्षरी ठरू लागली. त्या संबंधात असे म्हटले जाई.‘कलाक्षरे’ मधील या टिपणाद्वारे जाणकारांना विनंती आहे, ती अशी-दीनानाथ दलाल हे टोपणनाव दलालांनी कसे आणि केव्हापासून घेतले?- इंग्रजी म्हणजे रोमन अक्षरापासून ते देवनागरी अक्षरांपर्यंत दलाल ही स्वाक्षरी आली आणि पुढे त्रिकोणातला रंगीत ‘द’ आला. हा स्थित्यंतराचाच खुलासा कोणी कधी केला आहे का?खुद्द दलालांनी याबाबत काही कुठे म्हटले आहे का? आणखी थोडेसे. ‘लोकमत’तर्फे गेल्या दोन वर्षांपासून मुखपृष्ठकारांना पुरस्कार द्यायला सुरुवात झाली आहे, हे चांगलेच आहे, पण या निमित्ताने मुखपृष्ठकारांचे मनोगत घ्यायला काय हरकत आहे? विचार व्हावा, तर असो. दीनानाथ दलाल हे टोपणनाव आहे, हे कळल्यानंतर मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठकारांबाबत असे काही-बाही सुचत गेले. मुखपृष्ठकारांना काही वाटते का?