शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

आता औषध कंपन्या

By admin | Updated: May 11, 2015 05:19 IST

कॅगची वक्रदृष्टी देशातील औषध कंपन्यांकडे वळल्यानंतर आता त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आले असून, या गैरव्यवहारात संबंधित कंपन्यांनी डॉक्टर मंडळींना तर सामील करून घेतले.

सरकारी कारभारातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार यांच्यावर बारीक लक्ष ठेवणारी आणि भल्याभल्यांना घाम फोडणारी ‘कॅग’ म्हणजे महालेखापाल ही संस्था आता देशातील सर्वसामान्यांनाही चांगलीच ज्ञात झाली आहे. संपुआच्या काळातील राष्ट्रकुल संघाच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचारापासून तो कोळसा खाणींच्या वाटपातील भ्रष्टाचारापर्यंत सरकारी पातळीवरील सारे गडबडगुंडे याच कॅगने हुडकून काढले आणि अनेकांसाठी कारागृहाचे दरवाजे उघडून दिले. याच कॅगची वक्रदृष्टी देशातील औषध कंपन्यांकडे वळल्यानंतर आता त्यांच्यातील आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आले असून, या गैरव्यवहारात संबंधित कंपन्यांनी डॉक्टर मंडळींना तर सामील करून घेतलेच, पण त्याशिवाय आयकर विभागानेही औषध कंपन्यांच्या आयकर विवरणपत्रांची काटेकोर छाननी व तपासणी केली नाही, असे ताशेरे कॅगने ओढले आहेत. वैद्यकीय व्यवसायातील लोक म्हणजेच डॉक्टरांवर व्यवसाय वृद्धीसाठी आणि कंपनीच्या अंतर्गत संशोधन कामासाठी केलेला अवाढव्य खर्च संबंधित कंपन्या ‘खर्च खाती’ दाखवून आयकरातून सूट पदरात पाडून घेतात, असे कॅगला जेव्हा आढळून आले तेव्हा तिने आयकर विभागाकडे यासंदर्भात चौकशी सुरू केली. देशातील सर्व औषध कंपन्यांची आयकराची विवरणपत्रे सादर करा, असा हुकूम कॅगने सोडला. पण आयकर विभाग पूर्ण तीन हजार विवरणपत्रेही सादर करू शकला नाही. त्यांचीच सखोल चिकित्सा केली असता, सुमारे अडीचशे विवरणपत्रांद्वारे तब्बल साडेतेराशे कोटी रुपयांच्या आयकराची लूट कॅगला आढळून आली. अधिक चौकशी करता, डॉक्टरांनी आपण उत्पादिलेली औषधेच रुग्णांना घ्यायला सांगावीत यासाठी सदर कंपन्या या डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू देतात आणि त्या खर्चाची विवरणपत्राद्वारे वजावट मागतात, असे कॅगला आढळून आले. तथापि, डॉक्टरांनी अशा भेटी स्वीकारू नयेत असा दंडक मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने फार पूर्वीच लागू केला असून, डॉक्टरांवर केलेल्या अशा प्रकारच्या खर्चाची वजावट करता येणार नाही, असे स्पष्टीकरण सुमारे तीन वर्षांपूर्वीच प्रत्यक्ष कर मंडळाने संबंधितांकडे केले होते, हे येथे उल्लेखनीय. गुजरातेतील एका औषध कंपनीने डॉक्टरी व्यवसायातील दांपत्यांचा परदेश प्रवास आणि भेटवस्तू यावर तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवून आयकरातून अडीच कोटींची सूट पदरात पाडून घेतली, असे एक मासलेवाईक उदाहरणदेखील कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याशिवाय संशोधन वगैरे काहीही न करता, संशोधनावरील भरमसाठ खर्च दाखवून कंपन्यांनी सुमारे सहाशे कोटी रुपयांना आयकर विभागास ठकविल्याचेही हा अहवाल सांगतो. पण म्हणून आपल्या पावित्र्याचा सतत टेंभा मिरवित राहणाऱ्या वैद्यकीय व्यवसायावर कॅगच्या या अहवालाची काही मात्रा चालेल, असा विश्वास बाळगण्यात मात्र काही अर्थ नाही.

------------------------

ग्राहक चळवळीचे अध्वर्यूग्राहक हा राजा आहे, असे केवळ कागदावरच म्हणण्याची प्रथा होती़ प्रत्यक्षात त्याबाबत हिणविले जात असे़ या राजाला खरा मानसन्मान देण्यासाठी आपले आयुष्य व्यतीत करण्याचे कार्य बिंदूमाधव जोशी यांनी केले़ दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात जोशी यांचा सक्रिय सहभाग होता़ त्यानंतर त्यांनी ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या कामाकडे आपले सर्व लक्ष केंद्रित केले़ १९७२ मध्ये त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केली़ ग्राहकाला त्याच्या हक्काविषयी तेव्हा अजिबात जाणीव नव्हती़ त्यांनी देशभर फिरुन त्याविषयी जनजागृती केली़ केंद्र सरकारला सातत्याने पत्र, निवेदने सादर करुन, त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी कायदा करण्यासाठी प्रयत्न केले़ ग्राहक चळवळ उभारली़ त्याच्या देशभर शाखा स्थापन केल्या़ त्यांच्या या प्रयत्नांची शेवटी केंद्र शासनाने दखल घेऊन १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत केला़ त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण मंचची स्थापना करण्यात आली़ जोशी यांच्या या कार्याची दखल राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आली, तेव्हा घेण्यात आली़ १९९५ मध्ये स्वतंत्र मंत्रालय तयार करुन ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद देण्यात येऊन तिला कॅबिनेटचा दर्जा देण्यात आला़ स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट निर्मितीसाठी सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या सह निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले़ त्यांनीच स्थापन केलेल्या व ते संस्थापक असलेल्या ग्राहक पंचायतमधील कार्यकर्त्यांशी त्यांचे मतभेद झाले़ त्यातूनच जोशी यांनाच ग्राहक पंचायतचे बोधचिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली़ अशा विपरित परिस्थितीतही ते डगमगले नाहीत़ त्यांनी ग्राहक राजासाठी आपले संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले़ आज ग्राहक, ग्राहक चळवळ आणि ग्राहकांच्या म्हणण्याला जो प्रतिसाद, मान दिला जातो, त्यासाठी वातावरण, कायदा करण्याचा महत्त्वपूर्ण पाया बिंदूमाधव जोशी यांनी घातला आहे़ देशभरात ग्राहक चळवळ आहे, तोपर्यंत त्यांचे हे कार्य लक्षात ठेवले जाईल़