शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खासदार हेमंत गोडसेंना दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोरच आंदोलन करावे लागणं दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:34 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी.

- किरण अग्रवालसरकार निव्वळ घोषणाबाज आहे, असे आरोप विरोधकांनी करणे वेगळे; परंतु सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही तसे वाटत असेल किंवा त्यासंदर्भाने आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत असेल तर, ती बाब सत्ताधा-यांसाठी नाचक्कीदायकच म्हणायला हवी. राज्यांतर्गत विमानसेवेच्या प्रश्नावरून सत्ताधारी खासदार हेमंत गोडसे यांना नवी दिल्लीतील नागरी उड्डयण मंत्रालयासमोर आंदोलन करावे लागल्याच्या प्रकाराकडेही त्याचदृष्टीने पाहता यावे.विमानतळाची सुविधा असलेल्या लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्याकरिता केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६मध्ये ‘उडान’नामक योजना घोषित केली होती. यात महाराष्ट्रातील नाशिकसह दहा विमानतळांवरून प्रवासी सेवेसाठी एअर डेक्कन कंपनीला मान्यता देण्यात आली होती. चालू वर्षातील सप्टेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्याचेही आदेशित करण्यात आले होते. परंतु त्यासाठी आवश्यक ठरणारा मुंबईतील ‘टाईम स्लॉट’, ती व्यवस्था पाहणा-या खासगी कंपनीकडून नाकारला गेल्याने राज्यातील या प्रस्तावित नव्या विमानसेवा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी केंद्राच्या ‘उडान’ योजनेला जमिनीवरच घरघर लागल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात संबंधितांशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यानेच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट हवाई वाहतूक मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. केंद्रातील सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या सहयोगी खासदाराला केंद्रानेच घोषित केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी असे पाऊल उचलावे लागावे, यापेक्षा अधिक शोचनीयता काय ठरावी, असा यातील खरा प्रश्न आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील दहा शहरांतील सेवांसाठी मुंबईतील ‘टाईम स्लॉट’ नाकारणा-या खासगी कंपनीने त्याचवेळी गुजरातमधील सुरत, कांडला व पोरबंदर एअरपोर्टला मात्र त्याची मान्यता दिली आहे. यातून सदर कंपनीचे गुजरातधार्जिणेपण उघड होणारे असून, ते महाराष्ट्रावर अन्याय करणारेच म्हणावयास हवे. परंतु त्याबद्दल राज्यातील सत्ताधा-यांनाही फारसे काही वाटू नये, हे अधिक गंभीर आहे. केंद्राने घोषित केलेल्या योजनेला खो घालणारा निर्णय एखादी खासगी कंपनी कसा घेऊ शकते, असाही प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे.नाशिकचे विमानतळ राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ मध्येच बांधून तयार आहे. त्यानंतर येथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह निमा, आयमा व अन्य उद्योजकीय संघटनांनीही विविध पातळीवर पाठपुरावा चालविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व नाशिकनंतरचे शिर्डी विमानतळ सुरूही झाले; परंतु विमानतळ व सारी सिद्धता-सज्जता असूनही नाशिक, जळगावची सेवा रखडली आहे. केंद्राच्या ‘उडान’ योजनेंतर्गत ही सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती तर त्यात ‘टाईम स्लॉट’ची अडचण आली. आता अखेर १५ डिसेंबरचा मुहूर्त त्यासाठी मुक्रर करण्यात आला असला तरी, शिवसेनेला सत्ताधारी राहूनही दिल्लीतील रस्त्यावर उतरण्याची भूमिका त्याकरिता घ्यावी लागली. सरकारच्या घोषणांपलीकडील वास्तविकतेवर पुरेसा प्रकाश टाकणारी ही बाब असून, शिवसेनेने राजकीयदृष्ट्या अचूक ‘टायमिंग’ साधण्याची आयती संधी यातून घेतली, हे मात्र खरे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना