शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

संयत परंतु स्पष्ट

By admin | Updated: February 6, 2016 03:04 IST

चालू असणारे वित्तीय वर्ष संपायला अवघे दोनएक महिने बाकी असताना आणि मुख्य म्हणजे येऊ घातलेल्या वित्तीय वर्षासाठीचे केंद्रीय अंदाजपत्रक मोजक्या

चालू असणारे वित्तीय वर्ष संपायला अवघे दोनएक महिने बाकी असताना आणि मुख्य म्हणजे येऊ घातलेल्या वित्तीय वर्षासाठीचे केंद्रीय अंदाजपत्रक मोजक्या दिवसांवरच येऊन ठेपलेले असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देशाच्या पतधोरणात फार मोठे बदल करतील, अशी अपेक्षा बाळगणे बाळबोधपणाचे लक्षण ठरले असते. आणि नेमके घडलेही तसेच. पतधोरणाच्या द्वैमासिक आढावादरम्यान परिस्थिती ‘जैसे थे’ राखत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी त्यांच्या संयत पवित्र्याची पुन्हा एकवार प्रचिती आणून दिली. सरकार आणि सरकारच्या धोरणांवर दृश्यादृश्य प्रभाव गाजवणारे बलदंड कॉर्पोरेट मनसबदार यांच्या दबावाला झुकत व्याजदर कमी करण्याचा कमकुवतपणा राजन यांनी दाखवला नाही, ही बाब त्यांची अर्थशास्त्रीय प्रगल्भता आणि व्यावसायिक बांधिलकी या दोन्हीची साक्ष ठरते. व्याजाचे दर सर्वसाधारणपणे कमी होण्यासाठी रिझर्व्ह बँक हिरिरीने पावले उचलत नसल्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वाढत नसून त्यापायी अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकली जात नसल्याचा कांगावखोरपणा केंद्रात सत्तापट सांभाळणाऱ्या अलीकडील काळातील जवळपास सर्वच सरकारांनी नियमाने चालवलेला दिसतो. कागदोपत्री तयार असलेल्या परंतु अंमलबजावणीपायी ठप्प होऊन पडलेल्या प्रकल्पांमध्ये कुंठित बनलेल्या प्रस्तावित गुंतवणुकींचे अफाट आकडे, रिझर्व्ह बँकेच्या ताठर पतधोरणावर टीका करताना सोयीस्करपणे वापरले जातात. तसेच, ही सारी गुंतवणूक सरकारी बाबूंनी आवळलेल्या लालफितीपायी ठप्प होऊन पडल्याचे रडगाणेही तालासुरात आळवले जात असते. वस्तुत:, मुळात देशी काय अथवा परदेशी काय, बाजारपेठांमधील मागणी मान मुरगळून निपचीत पडलेली असल्याने कोणताही सूज्ञ उत्पादक वा कारखानदार मोठ्या धडाक्याने उलाढाल वाढवण्यासाठी पावले उचलेल, ही कल्पनाच विलक्षण असमंजसपणाची आहे. तसेच, थकित कर्जांच्या भाराखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँंकांचे ताळेबंद सध्या वाकलेले असल्याने केवळ रिझर्व्ह बँक सुलभ व्याजदराने मुबलक रोखता उपलब्ध करुन देते आहे म्हणून, अगोदरच तोंड पोळलेल्या बँका पदर खोचून कर्जे वाटण्यासाठी हात ओणवा करुन धावत सुटतील, अशी अपेक्षा बाळगणेही नासंमजसपणाचे ठरते. त्यामुळे, रिझर्व्ह बँकेने पतधोरणामध्ये सध्या कोणताही बदल न घडवण्यामागील संभाव्य कारणांची मुळे अन्यत्र शोधायला हवीत. पतधोरण काय अथवा सरकारचे वित्तीय धोरण काय, आर्थिक विकासाचा वार्षिक सरासरी दर दमदार राखणे आणि महागाईवर अंकुश ठेवणे, ही या दोन्ही धोरणांची आद्य उद्दिष्टे गणली जातात. या दोन्ही आघाड्यांवर परिणामकारक पावले उचलण्याची जबाबदारी आता या टप्प्यावर मुख्यत: सरकारची आहे, हा स्पष्ट संकेत रघुराम राजन यांनी पतधोरणामध्ये कोणताही बदल न घडवून केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिलेला आहे. रिझर्व्ह बँकेला चिंता वाटते ती मुख्यत: महागाईची. आज, अन्नधान्याची महागाई ही सर्वसाधारण महागाईची जननी ठरते आहे. यंदाचा पावसाळा नियमित आणि सरासरीइतका असेल अशी सगळ्यांचीच अपेक्षाही आहे आणि प्रार्थनाही. रब्बीच्या हंगामातील उत्पादनाचा नेमका अंदाज येत्या महिनाभरात येईल. येत्या खरीपातील पिके बाजारात येईपर्यंत, म्हणजे, अजून किमान आठ ते नऊ महिने अन्नधान्याच्या महागाईचे रंग रुप कसे असेल याची थोडीतरी अटकळ रब्बीच्या उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच बांधता येईल. दरम्यानच्या काळात, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, समजा, सरकारने केलीच तर बाजारपेठेतील मागणी उंचावून महागाईला इंधनपुरवठा होण्याची शक्यताच अधिक. दुसरीकडे, वेतन आयोगाच्या शिफारशींपायी सरकारच्या महसुली खर्चामध्ये भरगच्च भर पडून वित्तीय तुटीचे भगदाडही चांगल्यापैकी रुंदावेल. महागाईला त्यामुळे अधिकच सरपण लाभेल. पतधोरणामध्ये, म्हणूनच, कोणताही बदल रिझर्व्ह बँकेने आता केलेला नाही. पैशाचा पुरवठा आणि सरकारची तूट या दोन्ही बाबी महागाईला खतपाणी घालत राहतात. पतधोरणामध्ये काहीही बदल न झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात फरक पडणार नाही. म्हणजे, येत्या काळात महागाईवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला त्याची वित्तीय तूट नियंत्रित करण्यासाठी ठोस व कल्पक पावले उचलून त्यांची खंबीर अंमलबजावणी करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ पुरवावे लागेल. आपण काहीच हातपाय हालवायचे नाहीत आणि आर्थिक वाढीसाठी व महागाईच्या नियंत्रणासाठी सदासर्वकाळ रिझर्व्ह बँकेलाच काय ते वेठीस धरायचे, हा सरकारचा खाक्या आता पुरे झाला, हाच राजन यांच्या संयत परंतु स्पष्ट पवित्र्याचा इत्यर्थ !